​भूकंपानंतरही सिद्धार्थ करणार ‘न्यूझीलंड ट्रीप’ पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 12:22 IST2016-11-15T11:14:03+5:302016-11-15T12:22:54+5:30

सिद्धार्थ मल्होत्राने ‘न्यूझीलंड पर्यटनाच्या भारतीय अ‍ॅम्बेसिडर’ची जबाबदारी जरा जास्तच गांभिर्याने घेतल्याचे दिसतेय. सध्या तो न्यूझीलंडमध्ये सुट्या घालवत असून काल ...

After the earthquake Siddhartha will complete the 'New Zealand trip' | ​भूकंपानंतरही सिद्धार्थ करणार ‘न्यूझीलंड ट्रीप’ पूर्ण

​भूकंपानंतरही सिद्धार्थ करणार ‘न्यूझीलंड ट्रीप’ पूर्ण

द्धार्थ मल्होत्राने ‘न्यूझीलंड पर्यटनाच्या भारतीय अ‍ॅम्बेसिडर’ची जबाबदारी जरा जास्तच गांभिर्याने घेतल्याचे दिसतेय. सध्या तो न्यूझीलंडमध्ये सुट्या घालवत असून काल आलेल्या भूकंपानंतर तो ट्रीप अर्ध्यावर टाकून परत येणार नाहीए.

काल न्यूझीलंडमध्ये ७.५ रिश्टर स्केलचा मोठा भूकंप आला. त्यावेळी सिद्धार्थ रोटोरुआ येथे होता. ज्या देशाच्या पर्यटनाचा तो प्रचार करतो तेथे अशी एमर्जन्सी आलेली असताना त्याने ट्रीप अर्ध्यावर सोडून न येण्याचा त्याने निर्णय घेतला आहे. तेथे राहूनच तो आपल्या ‘अ‍ॅम्बेसिडर’च्या भूमिकेला जागणार आहे.

                                    

ट्विट करून त्याने लोकांसाठी प्रार्थना केली, ‘सुदैवाने भूकंपामुळे जास्त नुकसान झाले नाही . सर्व न्यूझीलंडवासीयांच्या सुरक्षेसाठी मी प्रार्थना करतो. क्राईस्टचर्च शहरात आता परिस्थिती पूर्ववत होऊ लागली आहे, हे ऐकून खूप बरे वाटले. सर्व काही लवकर ठीक होईल अशी मी कामना करतो.’




भूकंपानंतरची परिस्थिती

न्यूझीलंड पर्यटन विभागाने तेथील पर्यटनाला चालना मिळण्यासाठी व अधिकाधिक भारतीय पर्यकटकांना आकर्षित करण्यासाठी सिद्धार्थची भारतीय अ‍ॅम्बेसिडर म्हणून निवड केली होती. त्यानुसार तो ‘न्यूझीलंड पर्यटना’चा प्रचार-प्रसार करताना दिसतो. नुकताच तो तेथे ट्रीपवर गेला होता.

भूकंप आल्यामुळे तो क दाचित परत येईल असे वाटत होते; पण त्याने तेथेच राहण्याचा निर्णय घेऊन त्याची निवड किती योग्य आहे ते दाखवून दिले. ‘बार बार देखो’च्या अपयशानंतर ब्रेक घेण्यासाठी तो न्यूझीलंडला गेलेला आहे. रोटोरुआवरून तो आता आॅकलंडला जाणार आहे.




सिद्धार्थची फन ट्रीप

कामाच्या बाबतीत सांगायचे तर जॅकलिनसोबत त्याच्या ‘रिलोडेड’ सिनेमाची शूटींग सुरू आहे. त्याचबरोबर तो हृतिक रोशनच्या ‘बँग बँग’ सिक्वेलमध्येही दिसणार आहे. 

Web Title: After the earthquake Siddhartha will complete the 'New Zealand trip'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.