सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2021 15:45 IST2021-04-10T15:44:57+5:302021-04-10T15:45:20+5:30
अंकिताने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नात्याला तीन वर्षे झाल्याचे सांगितले.

सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता लोखंडेने विक्की जैनला निवडला आपला जोडीदार, रिलेशनशीपला झाली ३ वर्षे
बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडे खूप चर्चेत आली होती. याशिवाय अंकिता बऱ्याचदा सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओमुळेही चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर तिचा बॉयफ्रेंड विक्की जैनसोबतचा व्हिडीओ शेअर करत त्यांच्या नात्याला तीन वर्षे झाल्याचे सांगितले. तिच्या या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव होतो आहे.
अंकिता लोखंडे हिने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात ती आणि विक्की जैन डान्स करताना दिसत आहेत. तिने हा व्हिडीओ शेअर करत लिहिले की, तीन साल. एकत्रित तीन वर्षे.
अंकिता आणि विक्कीची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. काही भेटीनंतर दोघांमध्ये प्रेम फुलले. अंकिता विक्कीसोबतचे रोमाँटीक फोटो शेअर करत असते. विकी जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.
अंकिता याआधी अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत रिलेशनशिपमध्ये होती. दोघेही लिव्ह-इन-रिलेशनशिपमध्ये राहत होते. अंकिता आणि सुशांतची भेट 2009 मध्ये पवित्र रिश्ता मालिकेवेळी झाली होती. त्यानंतर दोघेही ६ वर्ष रिलेशनमध्ये होते. पुढे २०१६ मध्ये त्यांचे ब्रेकअप झाले.
या ब्रेकअप होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगितली गेली. पण तो भूतकाळ झाला आणि विकी हा अंकिताचा वर्तमान आहे.