टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानीनं शेअर केला हा फोटो, लिहिले - मिसिंग माय...
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2022 18:20 IST2022-09-24T18:20:15+5:302022-09-24T18:20:36+5:30
Disha Patani: दिशा पटानीने नुकतात फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहेत, जो व्हायरल होताना दिसत आहे.

टायगर श्रॉफसोबत ब्रेकअप झाल्यानंतर दिशा पटानीनं शेअर केला हा फोटो, लिहिले - मिसिंग माय...
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी (Disha Patani) तिच्या सुंदर लूक आणि लेटेस्ट फोटोंमुळे चर्चेत येत असते. पण यावेळी दिशा पटानीने सोशल मीडियावर तिचे काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत जे काही मिनिटांतच व्हायरल झाले आहेत. यासोबतच तिने या फोटोंला दिलेले कॅप्शनही चर्चेत राहिले आहे.
दिशा पटानी फिटनेस फ्रीक असण्यासोबतच प्राणीप्रेमी आहे. तिच्याकडे दोन पाळीव कुत्री आहेत, त्यापैकी एकाचे नाव बेला आणि दुसऱ्याचे नाव गोकू आहे. यासोबतच तिच्याकडे मांजरही आहे. यावेळी अभिनेत्री तिच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे, ज्यामुळे ती तिच्या पाळीव प्राण्यांना वेळ देऊ शकत नाही आणि त्यांना खूप मिस करत आहे.
वास्तविक दिशा पटानीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे, ज्यामध्ये ती तिच्या पाळीव कुत्री बेलासोबत दिसत आहे. त्याचवेळी, व्हिडिओमध्ये दिशा पटनीने बेलाला मिठी मारली आहे आणि ती त्याला किस करताना दिसत आहे. ही पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'मिसिंग माय बेलू'. याआधीही अभिनेत्रीला तिच्या पाळीव प्राण्यांवर प्रेम आणि प्रेमाचा वर्षाव करताना पाहिले आहे.
दिशाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, दिशा पटानी आगामी काळात अनेक मोठ्या चित्रपटांमध्ये आपली उपस्थिती दाखवणार आहे, ज्यात 'मलंग २' आणि 'वॉरियर' सारख्या उत्कृष्ट चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे. याआधी अभिनेत्री जॉन अब्राहम, तारा सुतारिया, अर्जुन कपूर यांच्यासोबत 'एक व्हिलन रिटर्न्स' या चित्रपटात स्क्रिन शेअर करताना दिसली आहे.