ब्रेक के बाद दिग्गज दिग्दर्शकांचे पुनरागमन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 01:09 IST2016-01-16T01:19:35+5:302016-02-12T01:09:46+5:30

वडील यश चोपडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शनात अनेक वर्षांनंतर पुनरागन करीत आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा ...

After the break, veteran directors return | ब्रेक के बाद दिग्गज दिग्दर्शकांचे पुनरागमन

ब्रेक के बाद दिग्गज दिग्दर्शकांचे पुनरागमन

ील यश चोपडा यांच्या जयंतीचे औचित्य साधून आदित्य चोपडा यांनी दिग्दर्शनात अनेक वर्षांनंतर पुनरागन करीत आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे. २00८मध्ये शाहरुख खानसोबत 'रब ने बना दी जोडी' नंतर आदित्य पुन्हा परतला आहे. सात वर्षांच्या गॅपनंतर या पुनरागमनाच्या वृत्ताने काही आणखी दिग्दर्शकांना आनंदी केले आहे, जे त्यांच्याप्रमाणेच अनेक वर्षांपासून पुनरागमनाची संधी शोधत आहेत. नोव्हेंबरमध्ये सलमान खान आणि सोनम कपूर या जोडी सोबत सूरज बडजात्यादेखील अनेक वर्षांनंतर परत येत आहे. त्यांचा यापूर्वीचा विवाह चित्रपट २00६मध्ये आला होता, ज्यामध्ये शाहिद कपूर आणि अमृता राव यांची जोडी होती.
या रांगेत आणखी काही दिग्दर्शकांचे नाव आहे, जे मोठय़ा काळानंतर परत येतआहे. यामध्ये आशुतोष गोवारीकर आहे. ५ वर्षांपूर्वी त्यांचा खेलेंगे हम जी जान से चित्रपट (अभिषेक बच्चन-दीपिका पदुकोण) बॉक्स ऑफिस वर फ्लॉप झाला होता. आता ते हृतिक रोशनसोबत मोहनजोदडो चित्रपटात व्यस्त आहेत. २0११ मध्ये अभिषेक बच्चन आणि कंगना यांचा चित्रपट गेम पासून कॅरीयर सुरू करणारे अभिनय दवे यांना पुनरागमनासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागली. नुकतेच त्यांनी जॉन अब्राहम आणि सोनाक्षी यांच्यासोबत फोर्सच्या सिक्वलचे चित्रीकरण सुरू केले आहे, पुढील वर्षी २0१६ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सध्या आणखी एका दिग्दर्शकाच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा झाला आहे. शाहरुख खानच्या रा-वन नंतर गायब झालेले दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांना माधुरी दीक्षित आणि जूही चावला यांच्यासोबत गुलाबी गैंग ने इतका मोठा झटका दिला की ते दिसेनासे झाले आणि आता आपला चित्रपट तुम बिनच्या सिक्वल सोबत अनुभव सिन्हा यांचा परतण्याचा मार्ग मोकळा झालाआहे. आता जुन्या काळातील आणखी काही दिग्गज दिग्दर्शकांचे पुनरागमन होत आहे. 

Web Title: After the break, veteran directors return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.