तब्बूनंतर निल नितीन मुकेशही दिसणार ‘गोलमाल ४’ मध्ये...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2017 18:35 IST2017-02-01T13:04:44+5:302017-02-01T18:35:44+5:30

अभिनेता निल नितीन मुकेश हा त्याची गर्लफ्रेंड रूक्मिनी सहाय हिच्यासोबत ९ फेब्रुवारीला उदयपुर येथे विवाहबद्ध होणार आहे. १७ फेब्रुवारीला ...

After all, Nitin Mukesh will also be seen in 'Golmaal 4'. | तब्बूनंतर निल नितीन मुकेशही दिसणार ‘गोलमाल ४’ मध्ये...

तब्बूनंतर निल नितीन मुकेशही दिसणार ‘गोलमाल ४’ मध्ये...

िनेता निल नितीन मुकेश हा त्याची गर्लफ्रेंड रूक्मिनी सहाय हिच्यासोबत ९ फेब्रुवारीला उदयपुर येथे विवाहबद्ध होणार आहे. १७ फेब्रुवारीला त्याच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईत पार पडणार आहे, हे तुम्हाला माहिती असेलच. पण, तुम्हाला हे ठाऊक आहे का? दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता अजय देवगन यांच्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटात तब्बूनंतर आता निल नितीन मुकेशही दिसणार आहे. त्याच्या लग्नानंतर तो ‘गोलमाल अगेन’च्या टीमला जॉईन करेल. 

ALSO READ : ​पाहा: नील नितीन मुकेश आणि रूक्मिणी सहाय यांचा प्री-वेडिंग अल्बम!

‘प्रेम रतन धन पायो’ मध्ये अभिनेता निल नितीन मुकेश याने ‘ग्रे’ शेडमधील भूमिका साकारलीय. ‘लफंगे परिंदे’,‘शॉर्टकट रोमिओ’,‘जॉनी गद्दार’,‘वझीर’,‘जॉनी गद्दार’,‘आ देखें जरा’ अशा अनेक चित्रपटांमध्ये निलने सहकलाकराच्याच भूमिका साकारल्या आहेत. ‘गोलमाल अगेन’ मधील त्याची भूमिका कशी आहे? याविषयी एका मुलाखतीत तो सांगतो,‘माझी भूमिका अत्यंत मजेदार आहे. एका बिझनेस टायकूनची भूमिका मी करतोय. कथानकाला पुढे नेण्यासाठी माझ्या व्यक्तीरेखेचा उपयोग करण्यात आला आहे. मी रोहित शेट्टीच्या चित्रपटांचा खुप मोठा फॅन आहे. त्याच्या कॉमेडीचा ब्रँड मला प्रचंड आवडतो.’ 

ALSO READ : ‘गोलमाल4’मध्ये तब्बू करणार कॉमेडी!

‘गोलमाल ४’ या चित्रपटासाठी त्याने विशेष मेहनत घेतल्याचे देखील सांगितले. तो म्हणतो,‘यावर्षी मला बॉलिवूडमध्ये येऊन दहा वर्षे पूर्ण होतील. गोलमाल ४ हा चित्रपट माझ्यासाठी खुप लकी ठरेल. या चित्रपटाची शूटिंग मुंबई आणि हैदराबाद येथे होणार आहे. यात माझ्यासोबत एक परफेक्ट टीम म्हणजेच परिणीती चोप्रा, अर्शद वारसी, तुषार कपूर, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे आणि तब्बू हे मुख्य भूमिकेत दिसतील.’ 

Web Title: After all, Nitin Mukesh will also be seen in 'Golmaal 4'.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.