अखेर बिप्सच्या लग्नावर जॉन बोलला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 18:56 IST2016-05-27T13:26:28+5:302016-05-27T18:56:28+5:30
नाते संपते पण प्रेम नाही, असे म्हटले जाते. पण जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्याबद्दल हे अगदी उलट आहे. ...
.jpg)
अखेर बिप्सच्या लग्नावर जॉन बोलला!
न ते संपते पण प्रेम नाही, असे म्हटले जाते. पण जॉन अब्राहम आणि बिपाशा बसू यांच्याबद्दल हे अगदी उलट आहे. जॉन-बिप्स एकेकाळी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पण अचानक दोघांचे ब्रेकअप झाले आणि त्यांच्यातील नात्यासोबत प्रेमही संपुष्टात आले. अनेक वर्षांनंतरही दोघांमधील दरी कायम आहे. ब्रेकअपनंतर आधी जॉनने संसार थाटला आणि अलीकडे बिपाशानेही करणसिंह ग्रोवर याच्यासोबत सात फेरे घेतले. बिप्सच्या लग्नाला सगळे बॉलिवूड हजर होते पण निमंत्रितांच्या यादीत जॉनचे नाव नव्हते.बिप्सच्या लग्नाबद्दल जॉनला प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा जॉन जाम चिडला होता. बिप्सच्या लग्नाबद्दल विचारणाºया रिपोर्टरचा माईक जॉनने रागाने दूर झिडकारला होता. पण आता बिप्सच्या लग्नाआधी नाही तर लग्नानंतर का होईना जॉन बोलला. होय, एका मुलाखतीत जॉनला बिपाशाच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर जॉन संतापला नाही तर आय विश यू हर आॅल दी बेस्ट...असे तो म्हणाला.