आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2019 14:19 IST2019-03-28T14:10:53+5:302019-03-28T14:19:03+5:30
आलियाच्या आरआरआर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण राजामौली यांनी बाहुबलीसारखा प्रसिद्ध चित्रपट बनवला आहे.

आलिया भट नंतर आता हा बॉलिवूडचा अभिनेता झळकणार दाक्षिणात्य चित्रपटात
गेल्या अनेक वर्षांपासून अनेक बॉलिवूडमधील स्टार दाक्षिणात्य चित्रपटात तर दाक्षिणात्य सुपरस्टार बॉलिवूडच्या चित्रपटात काम करताना दिसत आहेत. आता प्रेक्षकांची लाडकी आलिया भट देखील लवकरच प्रेक्षकांना एका दाक्षिणात्य चित्रपटात झळकताना दिसणार आहे. एसएस राजामौली यांच्यासोबत ती आरआरआर या चित्रपटात काम करत असून या चित्रपटातील तिची भूमिका खूपच वेगळी असणार आहे.
आलियाच्या आरआरआर या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण राजामौली यांनी बाहुबलीसारखा प्रसिद्ध चित्रपट बनवला आहे. त्यांच्या बाहुबली सिरिजमधील दोन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. या चित्रपटांनी आजवरच्या सगळ्या बॉलिवूडमधील देखील चित्रपटांचे रेकॉर्ड मोडले आहेत. त्यामुळे आलिया आणि राजामौली यांच्या या आगामी चित्रपटाची प्रेक्षकांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
आलियानंतर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान देखील आपल्याला आता एका दाक्षिणात्य चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे. विजय यांच्या थलापथी ६३ या या चित्रपटात शाहरुख एक कॅमिओ करणार असल्याची बातमी नुकतीच पिंकविला या वेबसाईटने दिली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अॅटलीने केले आहे. शाहरुख या चित्रपटात एका छोट्याशा भूमिकेत दिसणार असे म्हटले जात असले तरी शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून याबाबत काहीही दुजोरा देण्यात आलेला नाही. थलापथी ६३ या तामीळ चित्रपटात जॅकी श्रॉफ एका नकारात्मक भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. जॅकी या चित्रपटाचा भाग असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगण्यात आले होते. शाहरुख आणि जॅकी हे दोघेही दाक्षिणात्य चित्रपटात असल्यास प्रेक्षकांसाठी ती पर्वणीच ठरले यात काहीच शंका नाही.
We are happy to welcome #JackieShroff Sir on board #Thalapathy63 😊 pic.twitter.com/S4M67WZ9RP
— Archana Kalpathi (@archanakalpathi) March 21, 2019
शाहरुख खानने अद्याप कधीच तामिळ चित्रपटांमध्ये काम केले नाही. पण त्याला दक्षिणेत चांगलीच लोकप्रियता आहे. तसेच कॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता थला अजित सोबत शाहरुखने अनेक वर्षांपूर्वी असोका या चित्रपटात काम केले होते.
थलापथी ६३ या चित्रपटात विजयसोबतच कथिर, योगी बाबू, विवेक, डॅनियल बालाजी आणि आनंद राज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. थलापथी ६३ हा एक स्पोर्टस ड्रामा असून विजय या चित्रपटात फूटबॉल कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाला संगीत ए आर रहमान देणार आहेत.
#Thuppakki Unseen Working Stills😍😍#ThalapathyVijay@actorvijay@MsKajalAggarwal@ARMurugadoss#Thalapathy63pic.twitter.com/X1ASVfCt4Q
— Thalapathy Army Kerala™ (@TAKerala_off) March 24, 2019