तीस वर्षानंतर भाग्यश्रीने केला सलमान बाबतचा खुलासा, इतके वर्ष होते रहस्यच
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 13:59 IST2020-03-05T13:55:59+5:302020-03-05T13:59:03+5:30
काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भाग्यश्रीनं तिच्या वैवाहिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने सलमान खान बद्दलही नवा खुलासा केला होता.

तीस वर्षानंतर भाग्यश्रीने केला सलमान बाबतचा खुलासा, इतके वर्ष होते रहस्यच
बॉलिवूडचा मोस्ट बॅचलर सलमान खानचे आजपर्यंत अनेक अभिनेत्रींसह नाव जोडले गेले आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा सलमानच्या लग्नाचा विषय येतो तेव्हा त्याच्या अफेरच्याही चर्चा रंगतात. १९८९ साली 'मैने प्यार किया' मध्ये सलमान खान आणि भाग्यश्री अशी फ्रेश जोडी असलेला हा सिनेमा बॉक्ससुप ऑफिसवर रडुपर हिट ठरला होता. सिनेमातील भूमिकेमुळे भाग्यश्रीला रसिकांचे भरघोस प्रेम मिळाले. आजही रसिक भाग्यश्रीला विसलेले नाहीत. रसिकांच्या हृदयात आजही भाग्यश्रीची जादू कायम आहे. भाग्यश्रीचे करिअर ऐन भरात असतानाच तिने लग्न केले आणि झगमगत्या दुनियेपासून दूर गेली. भाग्यश्रीच्या ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
काही दिवसांपूर्वी एका फंक्शनमध्ये भाग्यश्रीनं तिच्या वैवाहिक आयुष्यातील काही गोष्टींचा खुलासा केला होता. त्यानंतर तिने सलमान खान बद्दलही नवा खुलासा केला होता. ती म्हणाली, 'मैंने प्यार किया'चं शूटिंग सुरू होतं त्यावेळी मी हिमालय दसानीशी रिलेशनशिपमध्ये होते. पण सिनेमाच्या शूटिंग दरम्यान सलमानला भाग्यश्रीचे अफेअर सुरू असल्याचे माहिती होते. म्हणून तो तिची सतत थट्टा मस्करी करायचा. त्यावेळी मी त्याला नेहमीच सांगायचे की तुझ्या अशा वागण्यामुळे लोकांना आपल्या दोघांतच काही तर सुरू असल्याचे वाटेल.
कबूतर जा...जा... या गाण्याच्या शूटींगवेळी भाग्यश्री ढसाढसा रडली होती. सलमान भाग्यश्रीला आलिंगन देतो, असा एक सीन या गाण्यात होता. हा सीन शूट झाला आणि भाग्यश्री ढसाढसा रडू लागली. इतकी की, सलमान तर पार घाबरला. अखेर दिग्दर्शक सूरज बडजात्या तिच्याजवळ आलेत आणि त्यांनी तिला रडण्याचे कारण विचारले. यावर भाग्यश्रीने दिलेले उत्तर ऐकून आज कदाचित तुम्हाला हसू येईल. होय, ‘मी एका कंजर्वेटीव्ह फॅमिलीतून आहे. याआधी मी कुणालाही अशाप्रकारे अलिंगन दिलेले नव्हते. त्यामुळे मी घाबरले....,’ असे तिने सांगितले.