तब्बल 22 वर्षानंतर तब्बू 'या' अभिनेतासोबत शेअर करणार स्क्रिन, अजय देवगणसुद्धा आहे या चित्रपटाचा हिस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2018 10:17 IST2018-05-02T04:47:45+5:302018-05-02T10:17:45+5:30

अजय देवगण आणि तब्बू लव रंजन प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट ...

After 22 years, the screen will be shared with Tabu's actor, Ajay Devgan is also part of the film. | तब्बल 22 वर्षानंतर तब्बू 'या' अभिनेतासोबत शेअर करणार स्क्रिन, अजय देवगणसुद्धा आहे या चित्रपटाचा हिस्सा

तब्बल 22 वर्षानंतर तब्बू 'या' अभिनेतासोबत शेअर करणार स्क्रिन, अजय देवगणसुद्धा आहे या चित्रपटाचा हिस्सा

य देवगण आणि तब्बू लव रंजन प्रोडक्शन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. हा एक रोमाँटिक कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन आकिव अली करतो आहे. आकिव अलीच्या रॉम-कॉममधून तब्बल 22 वर्षानंतर एक जुन्या सहकलाकारासोबत तब्बू स्क्रिन शेअर करणार आहे.   

1996 साली आलेल्या माचिस चित्रपटात तब्बू आणि जिम्मी शेरगिलने एकत्र काम केले होते. तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा एकदा रॉम-कॉममधून दोघे एकत्र दिसणार आहेत. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार दोघे कलाकारा अनेक वर्षानी एकत्र काम करत असल्याने खूप खूश आहे.  



रॉम-कॉमचे शूटिंग करताना अजयला टेनिस एल्बोचा त्रास असल्याचे समोर आलंय. शूट दरम्यान प्रत्येक शॉटनंतर त्याला प्रचंड वेदना होतायेत. एब्लोमुळे होणाऱ्या वेदना इतक्या असाह्य आहेत की त्याला कॉफीचा कप ही उचलणं कठिण झाले आहे. मात्र अशा परिस्थिती ही अजय देवगण शूट करतो आहे. त्याच्या सहकलाकार असलेल्या तब्बू आणि रकुलप्रीत यांना अजयला टेनिस एल्बोचा त्रास असल्याचे जणूदेखीस दिले नाही.  

जिम्मी जे. पी. दत्ता यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणारा ‘पलटन‘ या चित्रपट दिसणार आहे.  ६० च्या दशकातील भारत-चीन युद्धावर साकारणाºया या चित्रपटात सोनू सूद, पुलकित सम्राट, अर्जुन रामपाल, सुनील शेट्टी व जॅकी श्रॉफ दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल जे. पी. दत्ता कमालीचे उत्सुक आहेत. लोकांना एक नवी कथा सांगण्याची वेळ आली आहे. ‘पलटन’मधून देशाच्या इतिहासाचा एक नवा अध्याय लोकांपुढे मांडला जाईल, असे जे. पी. दत्ता एका मुलाखतीत म्हणाले होते. अभिषेक बच्चने जे. पी. दत्ता यांच्या ‘रिफ्युजी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यात तो करिना कपूरसोबत दिसला होता.

Web Title: After 22 years, the screen will be shared with Tabu's actor, Ajay Devgan is also part of the film.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.