तब्बल 11 वर्षांनंतर अतुल कुलकर्णीची 'या' साऊथच्या सुपरस्टारसोबत जमणार जोडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2017 12:27 IST2017-10-09T06:57:41+5:302017-10-09T12:27:41+5:30
साऊथ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला स्टार सिध्दार्थ येत्या 3 नोव्हेंबरला त्यांचा ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ चित्रपट घेऊन येतोय. ह्या ...

तब्बल 11 वर्षांनंतर अतुल कुलकर्णीची 'या' साऊथच्या सुपरस्टारसोबत जमणार जोडी
स ऊथ आणि हिंदी फिल्म इंडस्ट्रीतला स्टार सिध्दार्थ येत्या 3 नोव्हेंबरला त्यांचा ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ चित्रपट घेऊन येतोय. ह्या चित्रपटाची निर्मिती करण्यासोबतच सिध्दार्थने ह्या सिनेमात अभिनयही केलेला आहे.
सिध्दार्थसोबत या चित्रपटात अभिनेता अतुल कुलकर्णीही दिसणार आहे. अतुल आणि सिध्दार्थने 11 वर्षांपूर्वी ‘रंग दे बसंती’ चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट 2006 सालचा सुपरहिट चित्रपट होता. यात सिद्धार्थ आणि अतुलसोबत आमीर खान, सोहा अली खान, कुणाल कपूर आणि शर्मन जोशी यांच्या मुख्य भूमिका होत्या. याचित्रपटातून देशभक्तीवर भाष्य करण्यात आले होते. ह्या चित्रपटानंतर आता अतुल कुलकर्णी आणि सिध्दार्थचे चाहते ‘दि हाऊस नेक्सट डोअर’ मधून पुन्हा एकदा दोघांना एकत्र पाहू शकतील.
‘दि हाऊस नेक्स्ट डोअर’ हा चित्रपट व्हायकॉम 18 मोशन पिक्चर्स आणि इताकी एन्टरटेन्मेटची निर्मिती आहे. मिलिंद राव ने दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात सिध्दार्थ, एन्ड्रीया जेरेमिया आणि अतुल कुलकर्णी आहेत. हा चित्रपट 3 नोव्हेंबर 2017ला झळकणार आहे.
अतुल कुलकर्णी कंगना राणौवतच्या 'मणिकर्णिका- द क्वीन ऑफ झांसी' चित्रपट दिसणार आहे. यात तो तात्याराव टोपेंच्या भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूतची एक्स गर्लफ्रेंड अकिंता लोखंडे बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यात ती झलकारी बाईच्या भूमिकेत दिसणार आहे. झलकारी बाई या राणी लक्ष्मीबाईंच्या खास व्यक्तिंपैकी एक होत्या. इतिहासात इलकारीबार्इंचे अनन्यासाधारण स्थान आहे.. झलकारी बाईंने इंग्रजांच्या विरोधात मोर्चा उघडला होता. युद्धात राणी लक्ष्मीबाई यांच्या जागी झलकारी बाई यांना ठेवण्यात आले होते. झलकारी बाईने आपल्या शौर्याने आणि बुद्धिचातुर्याने राणी लक्ष्मीबाईंच्या निकटवतीर्यांमध्ये महत्त्वाचे स्थान प्राप्त केले होते. एका इंटरव्ह्यु दरम्यान अंकिता म्हणाली होती की, ''झलकारी बाईंबदल लोकांना फारशी माहिती नाही आहे. खूप काही लोकांना राणी लक्ष्मीबाई आणि झलकारी बाई यांच्या नात्याविषयीदेखील माहिती आहे''. या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईंच्या भूमिकेत कंगाना राणौवत दिसणार आहे.