n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">दिग्दर्शक रवी जाधव यांच्या बँजो या चित्रपटात आदित्य नारायण काम करणार होता असे कळतेय. या चित्रपटातील आदित्यची व्यक्तिरेखाही त्याला खूप आवडली होती. चित्रीकरण करण्यासाठीही तो खूपच उत्सुक होता. पण रितेश देशमुख त्याच्या इतर चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र असल्याने त्याला बँजोसाठी तारखा देता येत नव्हत्या आणि ज्यावेळी रितेशला वेळ मिळाला, तेव्हा आदित्यला सारेगमपचे चित्रीकरण सुरू होणार असल्याचे कळले. आदित्य सारेगपमचा गेल्या कित्येक वर्षांपासून भाग असल्याने त्याने पहिली पसंती सारेगमपला दिली. बँजो या चित्रपटात काम करायला मिळाले नसले तरी भविष्यात एखाद्या चित्रपटात अभिनय करायची त्याची इच्छा असल्याचे कळतेय.