आदित्य ठाकरेंचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो, फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2020 13:42 IST2020-08-03T13:42:11+5:302020-08-03T13:42:56+5:30
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा त्यांच्या कारमध्ये एका तरूणीसोबतचा फोटो मागील काही तासांमध्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसतो आहे.

आदित्य ठाकरेंचा सोशल मीडियावर व्हायरल होतोय फोटो, फोटोमधील तरूणी रिया चक्रवर्ती नव्हे तर...
महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा त्यांच्या कारमध्ये एका तरूणीसोबतचा फोटो मागील काही तासांमध्ये सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होताना दिसतो आहे. काही युजर्सने ही तरूणी रिया चक्रवर्ती असल्याचे म्हटले आहे. पण ती तरूणी रिया चक्रवर्ती नसून ती अभिनेत्री दिशा पटानी आहे. वर्षभरापूर्वी आदित्य आणि दिशा मुंबईमध्ये एका रेस्ट्रॉरंटमध्ये एकत्र जेवायला गेले होते. तेव्हा काढलेला हा फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
इतका जुना फोटो आता का व्हायरल होतोय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल ना. तर सध्या सुशांतच्या आत्महत्येसाठी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या घरातल्यांनी केला आहे. पाटनामध्ये तशी तक्रार दाखल झाल्यानंतर आता मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत. सुशांतच्या चाहत्यांनी या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.
जब उद्धव ठाकरे का बेटा #सुशान्त_सिंह की गर्ल फ्रेंड #रिया_चक्रवर्ती के साथ घुम रहा है तब कहा से सुशांत सिंह की हत्या की #CBI जांच होगी 🤔😠👇 pic.twitter.com/cVXt1RUeyI
— Ankita Dave (@AnkitaDaveIN) August 1, 2020
सोशल मीडियावर मात्र काही युजर्सने दिशा पटानी आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्र गाडीमधील फोटो पोस्ट करून फोटोतील तरूणी रिया चक्रवर्ती असून तिची आणि आदित्य ठाकरेंची मैत्री आहे. म्हणून महाराष्ट्र सरकार सुशांतच्या आत्महत्येचे प्रकरण सीबीआयकडे देत नसल्याचा तर्क लावला आहे. सुशांत मृत्यूप्रकरणी मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम रियाला चौकशीसाठी बोलावले होते.
Why @theShivsena doesn’t want CBI inquiry. Because Aaditya Thackeray is friends with Rhea.#SushantSinghRajpoot#SushantInOurHeartsForeverpic.twitter.com/yGZKsemo6e
— @Torpedo2019 (@Torpedo_2019) August 2, 2020
रिया या चौकशीला हजर होती. तिचा जबाब पोलिसांनी नोंदवला होता. मात्र सुशांतच्या वडिलांनी बिहार पोलिसांत रियाविरोधात तक्रार दाखल करताच रिया मुंबईतून गायब झाली. अलीकडे तिने तिचा एक व्हिडीओ जारी केला होता. ‘मला आपली न्यायव्यवस्था व देवावर पूर्ण विश्वास आहे. मला न्याय जरूर मिळेल. सत्यमेव जयते,’ असे ती या व्हिडीओत म्हणाली होती. असे असताना बिहार पोलिसांसमोर यायला रिया का घाबरत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.