​आदित्य रॉय कपूर घालविला खास चाहतीसोबत एक दिवस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2016 21:08 IST2016-12-27T21:08:55+5:302016-12-27T21:08:55+5:30

चित्रपट अभिनेत्यांना असणाºया सामाजिक जाणिवेची उदाहरणे आपण पाहतच असतो. अशा अभिनेत्यात आता आदित्य रॉय कपूरचे नावही सामील झाले आहे. ...

Aditya Roy Kapoor spent a day with special wish! | ​आदित्य रॉय कपूर घालविला खास चाहतीसोबत एक दिवस!

​आदित्य रॉय कपूर घालविला खास चाहतीसोबत एक दिवस!

ong>चित्रपट अभिनेत्यांना असणाºया सामाजिक जाणिवेची उदाहरणे आपण पाहतच असतो. अशा अभिनेत्यात आता आदित्य रॉय कपूरचे नावही सामील झाले आहे. आदित्यने आपला संपूर्ण दिवस त्याच्या एका खास महिला फॅनसोबत घालवला. या फॅन मुलीचे नाव आहे लुनिका नागदेव. लुनिकाची इच्छा आदित्यला भेटण्याची होती ती आदित्यने पूर्ण केली आहे. 

आदित्य रॉय कपूर चांगला अभिनेता आहेच शिवाय तो एक चांगला व्यक्ती देखील आहे. हे या घटनेवरून सिद्ध झाले आहे. लुनिला नागदेव ही मुलगी एका गंभीर आजाराने पीडित असून तिला आदित्य रॉय कपूरला भेटण्याची इच्छा होती ही गोष्ट जेव्हा आदित्यच्या कानावर आली तेव्हा त्याने आपल्या व्यस्त शेड्युलमधून एक दिवस काढून लुनिकाची भेट घेतली. लुनिका सध्या एका रुग्णालयात उपचार घेत आहे. आदित्यने सकाळी पोहचून लुनिकाला सरप्राईज दिले. 

‘मेक अ विश फाउंडेशन’च्या कार्यकर्त्यांना एक गंभीर रुग्ण आदित्यला भेटण्याची इच्छा व्यक्त करीत आहे असे समजले. त्यांनी आदित्य आणि त्याच्या टीमला ही गोष्ट कळवली आणि लुनिका आणि आदित्यची भेट घडवली. आदित्यने संपूर्ण दिवस तिच्यासोबत घालवला. रुग्णालयातील इतर पेशंटही आदित्यला पाहून खूश झाले. आपल्या आवडत्या कलाकाराला पाहून लुनिका आणि इतर पेशंट खूप आनंदित झाले.

आदित्य रॉय कपूर व श्रद्धा कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ओके जाणू हा चित्रपट लवकर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर व गाणी रिलीज झाली आहेत. ओक जानू मधील गाणी चाहत्यांच्या ओठांवर रुळली असून या चित्रपटात आदित्य व श्रद्धाची हॉट केमेस्ट्री पहायला मिळणार आहे. 

Web Title: Aditya Roy Kapoor spent a day with special wish!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.