आदित्य पांचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमन नव्हे तर या अभिनेत्यासोबतही कंगना राणौतचे होते अफेअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2017 11:04 IST2017-09-11T05:34:13+5:302017-09-11T11:04:13+5:30
कंगणा राणौतची आप की अदालतमधील मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीत हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली ...
.jpg)
आदित्य पांचोली, हृतिक रोशन, अध्ययन सुमन नव्हे तर या अभिनेत्यासोबतही कंगना राणौतचे होते अफेअर
क गणा राणौतची आप की अदालतमधील मुलाखत सध्या सोशल मीडियावर चांगलीच गाजत आहे. या मुलाखतीत हृतिक रोशन आणि आदित्य पांचोली या तिच्या पूर्वप्रियकरांचा तिने उल्लेख केला आहे. त्यांच्यावर अनेक आरोप देखील तिने केले आहेत. पण या सगळ्यात तिने अध्ययन सुमन आणि अजय देवगण या तिच्या पूर्व प्रियकरांचा उल्लेख करणे टाळले आहे. अजय देवगण हे नाव ऐकून तुम्हाला नक्कीच धक्का बसला असेल. पण हे खरे आहे, कंगनाचे अजय देवगणसोबतही नाव जोडले गेले होते.
![kangana ranaut ajay devgan]()
कंगना आणि अजय यांनी वन्स अपाऊन अ टाइम इन मुंबई या चित्रपटात काम केले होते. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अजय आणि कंगना यांच्यात सूत जुळले. अजयचे काजोलसोबत लग्न झालेले असूनही कंगना आणि अजयच्या प्रेमप्रकरणाची चांगलीच चर्चा होत होती. या चित्रपटानंतर ते दोघे रासकल्स आणि तेज या चित्रपटांमध्ये देखील एकत्र झळकले. या दोन्ही चित्रपटांमध्ये अजयच्या शिफारसीवरूनच कंगनाला घेण्यात आले असल्याचे देखील म्हटले जाते. तेज या चित्रपटात विद्या बालनने काम करावे अशी या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रियदर्शन यांची इच्छा होती. नायिकेच्या भूमिकेसाठी विद्याच योग्य असल्याचे त्यांचे म्हणणे होते. पण अजयने कंगनाला चित्रपटात घेण्यासाठी प्रियदर्शन यांची मनधरणी केली अशा बातम्या त्या वेळात चांगल्याच गाजल्या होत्या.
कंगना आणि अजय या दोघांनीही नात्यात सिरियस व्हायचे नाही असेच ठरवले होते. पण कंगना अजयमध्ये चांगलीच इन्व्होल्व्ह होत केली अशा बातम्या देखील अनेक वर्तमानपत्रांनी दिल्या होत्या. अजय काहीही झाले तरी काजोलला सोडायला तयार नव्हता. त्यामुळे कंगना अजयवर नाराज झाली होती. कंगनाने स्टारडस्ट या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, एका लग्न झालेल्या पुरुषावर प्रेम करून मी खूप मोठी चूक केली होती.
कंगना आणि हृतिकच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सुरू होत असतानाच आता अजय आणि कंगनाच्या जुन्या प्रेमप्रकरणाची अनेकांना आठवण आली आहे.
Also Read : आदित्य पांचोली सांगतोय कंगना राणौत मला पत्नीसारखीच