'त्या' दिवशी कॉन्सर्टमध्ये काय घडलं? आदित्य नारायणचा मॅनेजर म्हणाला, "तो त्याचा पाय पकडून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 11:48 IST2024-02-14T11:42:06+5:302024-02-14T11:48:06+5:30

आदित्य नारायणच्या त्या व्हायरल व्हिडीओवर इव्हेंट मॅनेजरने त्या दिवशी काय घडलं याचा खुलासा केलाय

Aditya narayan had to throw the phone..; The event manager told what actually happened | 'त्या' दिवशी कॉन्सर्टमध्ये काय घडलं? आदित्य नारायणचा मॅनेजर म्हणाला, "तो त्याचा पाय पकडून..."

'त्या' दिवशी कॉन्सर्टमध्ये काय घडलं? आदित्य नारायणचा मॅनेजर म्हणाला, "तो त्याचा पाय पकडून..."

गेल्या काही दिवसांपासून आदित्य नारायण (Aditya Narayan) चांगलाच चर्चेत आहे. एका कॉलेज इव्हेंटमध्ये आदित्य नारायणने रागाच्या भरात एका फॅनला मारहाण केली आणि त्याचा फोन लांब फेकून दिला. आदित्यचा हा व्हिडीओ पाहताच सर्वच स्तरांमधून संतप्त प्रतिक्रिया आल्या. आदित्यचं हे प्रकरण चांगलंच तापत असताना त्या इव्हेंटच्या मॅनेजरने झालेल्या प्रकारावर मौन सोडलंय. आणि घडलेला प्रकार सर्वांना सांगितलाय. 

आदित्यच्या त्या घटनेबद्दल इव्हेंट मॅनेजरने झूमला खास मुलाखत दिली आणि म्हणाला, "आदित्यने ज्याचा फोन फेकला तो त्या कॉलेजचा विद्यार्थी नव्हता. आदित्य गात असताना तो सारखं सारखं त्याचे पाय खेचत होता. तो कॉलेजचा विद्यार्थी नसूनही आगाऊपणा करत होता.  त्यामुळे आदित्यचा राग अनावर झाला. आणि त्याने रागाच्या भरात त्याचा फोन फेकून दिला."

 

दरम्यान बॉलिवूडचा लोकप्रिय गायक आदित्य नारायण सतत नवनवीन वाद ओढवून घेतो. काहीच दिवसांपुर्वी भिलाई येथील Rungta R2 College मधून आदित्यचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हि़डीओत आदित्य गाताना दिसत असून खाली असलेल्या फॅनचा मोबाईल तो हिसकावतो आणि दूर फेकून देतो. आदित्यच्या या व्हिडीओवर सर्वांनी त्याच्यावर चांगलीच टीका केली.

Web Title: Aditya narayan had to throw the phone..; The event manager told what actually happened