'उरी'मध्येच लपला होता 'धुरंधर २'मधील क्लायमॅक्सचा ट्विस्ट? चाहत्यांनी शोधून काढलं राकेश बेदींच्या भूमिकेचं 'ते' कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2026 16:07 IST2026-03-26T15:57:39+5:302026-03-26T16:07:23+5:30

चाहत्यांनी एक भन्नाट 'फॅन थिअरी' शोधून काढली आहे.

Aditya Dhar Dhurandhar 2 Uri Connection Rakesh Bedi Role Spoiler Fan Theory | 'उरी'मध्येच लपला होता 'धुरंधर २'मधील क्लायमॅक्सचा ट्विस्ट? चाहत्यांनी शोधून काढलं राकेश बेदींच्या भूमिकेचं 'ते' कनेक्शन

'उरी'मध्येच लपला होता 'धुरंधर २'मधील क्लायमॅक्सचा ट्विस्ट? चाहत्यांनी शोधून काढलं राकेश बेदींच्या भूमिकेचं 'ते' कनेक्शन

आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे कलाकार झळकले आहेत. उत्कृष्ट अ‍ॅक्शन, बारकाईने केलेली डिटेलिंग आणि दमदार कास्टिंगमुळे हा चित्रपट यंदाच्या सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरला आहे. या चित्रपटातील छोट्या-छोट्या गोष्टींची आता जोरदार चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः ज्येष्ठ अभिनेते राकेश बेदी यांच्या भूमिकेमुळे चाहत्यांनी एक भन्नाट 'फॅन थिअरी' शोधून काढली आहे. ज्याचा संबंध थेट ७ वर्षांपूर्वी आलेल्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटाशी जोडला जात आहे.

'धुरंधर: द रिव्हेंज' या चित्रपटात राकेश बेदी यांनी 'जमील जमाली' नावाच्या एका वरिष्ठ पाकिस्तानी राजकारण्याची भूमिका साकारली आहे. संपूर्ण चित्रपटात ते पाकिस्तानचे एक निष्ठावंत नेते वाटतात. मात्र, चित्रपटाच्या शेवटी एक मोठा ट्विस्ट मिळतो. प्रत्यक्षात ते भारतासाठी गुपचूप काम करत असतात आणि त्यांची खरी निष्ठा भारताशी असते, असे उघड होते. हा सीन पाहून प्रेक्षक थक्क झाले आहेत.

'उरी' चित्रपटाशी काय कनेक्शन?
चाहत्यांच्या मते, या ट्विस्टची हिंट आदित्य धरनं त्याच्या 'उरी: द सर्जिकल स्ट्राईक' या चित्रपटात आधीच दिली होती. 'उरी'मध्येही राकेश बेदी यांनी एका अशा पाकिस्तानी आयएसआय (ISI) अधिकाऱ्याची भूमिका साकारली होती, जो छुप्या पद्धतीने भारतीय लष्कराला मदत करत असतो. सोशल मीडियावर अनेक चाहत्यांनी असा दावा केला आहे की, आदित्य धरनं अत्यंत हुशारीने आपल्या दोन्ही चित्रपटांना एकाच धाग्यात गुंफले आहे. या रंजक थिअरीवर दिग्दर्शक आदित्य धरनं अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, या चर्चांमुळे प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. 'धुरंधर: द रिव्हेंज'मधील असे बारकावे शोधण्यासाठी प्रेक्षक आता पुन्हा-पुन्हा हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत आहेत.
 

Web Title : 'ध्रुवंधर 2' का क्लाइमेक्स 'उरी' में छिपा था? प्रशंसकों को मिला कनेक्शन।

Web Summary : प्रशंसकों का मानना है कि 'ध्रुवंधर: द रिवेंज' का ट्विस्ट 'उरी' फिल्म से जुड़ा है। राकेश बेदी का किरदार, जो शुरू में एक पाकिस्तानी राजनेता है, गुप्त रूप से भारत की मदद करता है। यह उनकी 'उरी' भूमिका को दर्शाता है, जिससे निर्देशक आदित्य धर द्वारा रचे गए एक छिपे हुए कनेक्शन के बारे में अटकलें तेज हो गई हैं।

Web Title : 'Dhruvandhar 2' climax twist hidden in 'Uri'? Fans find connection.

Web Summary : Fans theorize 'Dhruvandhar: The Revenge' twist links to 'Uri' film. Rakesh Bedi's character, initially a Pakistani politician, secretly aids India. This mirrors his 'Uri' role, fueling speculation about a hidden connection orchestrated by director Aditya Dhar.