आदित्य चोप्रांच्या आगामी चित्रपटात राणी मुखर्जी दिसणार अपंग व्यक्तीरेखेत!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2017 11:40 IST2017-01-11T11:40:55+5:302017-01-11T11:40:55+5:30

‘बॉलिवूडची मर्दानी’ अभिनेत्री राणी मुखर्जी हिने २००५ मध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्लॅक’ या हिंदी चित्रपटात मुकबधीर मुलीची भूमिका ...

Aditya Chopra's upcoming film, Rani Mukherjee will appear in the disabled person! | आदित्य चोप्रांच्या आगामी चित्रपटात राणी मुखर्जी दिसणार अपंग व्यक्तीरेखेत!

आदित्य चोप्रांच्या आगामी चित्रपटात राणी मुखर्जी दिसणार अपंग व्यक्तीरेखेत!

ॉलिवूडची मर्दानी’ अभिनेत्री राणी मुखर्जी हिने २००५ मध्ये मेगास्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत ‘ब्लॅक’ या हिंदी चित्रपटात मुकबधीर मुलीची भूमिका केली होती. ‘ब्लॅक’ नंतर राणीला गंभीर भूमिकांचे आव्हान स्विकारणारी खंबीर अभिनेत्री म्हणून ओळखले जाऊ लागले. आव्हानात्मक भूमिका स्विकारण्याकडे राणीचा पहिल्यापासूनच कल दिसून येतो. ‘मर्दानी’ चित्रपटातही तिच्यातील पोलिस अधिकारी पे्रक्षकांना प्रचंड भावली. मात्र, मुलगी ‘अदिरा’च्या जन्मानंतर तिचा बॉलिवूडशी संबंध तुटल्यासारखा झाला. आता ती पुन्हा सिल्व्हर स्क्रिनवर कमबॅक करू इच्छितेय. निर्माता आदित्य चोप्रा यांच्या आगामी चित्रपटात राणी मुखर्जी एका अपंग व्यक्तीरेखेत दिसणार आहे. 

                                            
                                            ‘ब्लॅक’ चित्रपटातील राणी मुखर्जीची मुकबधीर मुलीची भूमिका खुप गाजली.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,‘ इमरान हाश्मी हा अगोदर चित्रपटाचा निर्माता आणि अभिनेता बनण्यास तयार झाला होता. काही कारणांमुळे त्याला हा प्रोजेक्ट सोडावा लागला. निर्माता आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी दोघांनाही चित्रपटाची स्क्रिप्ट प्रचंड आवडली. चित्रपटातील मुख्य भूमिका हाच चित्रपटाचा ‘हिरो’ आहे. अपंगत्व असलेल्या एका मुलाची ही कथा असून उडी मारताना त्याचा तोल जायचा, तर बोलताना तो मोठ्यांनी ओरडायचा.  इमरान आणि अभिषेक बच्चन दोघेही हा चित्रपट करायला तयार होते. पण, दिग्दर्शक सिद्धार्थ मल्होत्रा जेव्हा आदित्य चोप्रासोबत बोलले तेव्हा त्यांनी चित्रपटाचे निर्माता बनण्यास तयारी दाखवली. मात्र, आदित्यने सिद्धार्थला चित्रपटाचा मुख्य अभिनेता अभिनेत्रीमध्ये रूपांतरित करायला सांगितला. त्यामुळे  साहजिकच राणीला चित्रपटात काम  करण्याची संधी मिळाली. 

                             
                              ‘मर्दानी’ चित्रपटात राणी मुखर्जी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसली.

राणी मुखर्जी आता तिच्या या चित्रपटातील भूमिकेक डे अत्यंत आव्हानात्मक नजरेतून पाहत आहे. या तिच्या भूमिकेसाठी तिने विशेष सराव करायलाही सुरूवात केली आहे. ‘ब्लॅक’ मध्ये तिने या भूमिकेशी मिळतीजुळती भूमिका साकारल्याने तिच्यासाठी आगामी चित्रपटातील भूमिका ही फार काही कठीण असेल असे वाटत नाही. पाहूयात, प्रेक्षकांना ही भूमिका कितपत आवडते ते!

Web Title: Aditya Chopra's upcoming film, Rani Mukherjee will appear in the disabled person!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.