अनुष्काच्या हट्टापुढे आदित्य चोपडाची माघार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2016 16:21 IST2016-07-06T10:37:25+5:302016-07-06T16:21:13+5:30
यशराज बॅनरचा बहुप्रतीक्षीत ‘सुल्तान’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाºया अनुष्का शर्माच्या मनात काही ...
.jpg)
अनुष्काच्या हट्टापुढे आदित्य चोपडाची माघार!
य राज बॅनरचा बहुप्रतीक्षीत ‘सुल्तान’ हा सिनेमा आज रिलीज झाला. पण या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाºया अनुष्का शर्माच्या मनात काही वेगळेच होते. ‘सुल्तान’ सर्वात आधी विराट कोहलीने बघावा, अशी अनुष्काची इच्छा होती. खरे तर यशराज फिल्म्सचे चेअरमन आदित्य चोपडा प्रीमियर शोच्या बाबतीत चांगलेच कडक आहेत. होय, आदित्य मीडियासाठीही कधी आपल्या चित्रपटाचा प्रीमियर शो ठेवत नाहीत. मात्र अनुष्काची इच्छा मात्र आदित्यने पूर्ण केली. दोन दिवसांपूर्वी अनुष्काने बॉयफ्रेन्ड विराट कोहली याच्यासोबत ‘सुल्तान’चा प्रीमियर शो बघितला आहे. शेवटी स्त्री हट्ट तो..आदित्य काय, भले भले त्यापुढे झुकलेत!!