​आदित्य चोपडाच्या चित्रपटात किंगखान बनणार योद्धा!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 21:03 IST2016-06-15T15:33:47+5:302016-06-15T21:03:47+5:30

शाहरूख खान आणि आदित्य चोपडा पुन्हा इतक्या लवकर एकत्र येतील, असे वाटले नव्हते. पण हे खरे आहे..‘फॅन’आपटल्यानंतर आदित्य आणि ...

Aditya Chopra's film will make King Khan a warrior !! | ​आदित्य चोपडाच्या चित्रपटात किंगखान बनणार योद्धा!!

​आदित्य चोपडाच्या चित्रपटात किंगखान बनणार योद्धा!!

हरूख खान आणि आदित्य चोपडा पुन्हा इतक्या लवकर एकत्र येतील, असे वाटले नव्हते. पण हे खरे आहे..‘फॅन’आपटल्यानंतर आदित्य आणि शाहरूख खान यांच्यात सर्व काही आॅलवेल नसल्याच्या बातम्या मध्यंतरी आल्या. ‘सुल्तान’ विरूद्ध ‘रईस’ बॉक्सआॅफिसवर कॅ्रश होणार, असे दिसताच यशराज फिल्म्स्ने ‘रईस’ची रिलीज डेट लांबणीवर टाकण्यास दबाव आणला, अशीही बातमी आली. अर्थात बॉलिवूडमध्ये काहीही परमर्नंट नाही. त्यामुळेच किंग खान आणि आदित्य चोपडा यांनी पुन्हा हातमिळवणी केली आहे  म्हणे. आदित्यच्या पुढील चित्रपटात एसआरके योद्धा बनणार असल्याची बातमी आहे. इम्तियाज अलीचा चित्रपट हातावेगळा केला की शाहरूख आदित्यच्या चित्रपटाचे काम सुरु करणार आहे. आदित्यचा हा महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट असेल आणि यात शाहरूख योद्धा दिसेल...व्वा!!

आदित्यच्या चित्रपटात शाहरूख योद्धा बनणार अशी बातमी येताच, एका चाहत्याने योद्धा रूपातील शाहरूखचे चित्रही काढले. पाहा तर..

Web Title: Aditya Chopra's film will make King Khan a warrior !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.