आदित्य-आलिया दिसणार एकत्र?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:11 IST2016-12-31T19:11:12+5:302016-12-31T19:11:12+5:30
२०१४ ला रिलीज झालेला हॉलिवूड रोमँटिक चित्रपट ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ याचा हिंदी रिमेक लवकरच येणार असून, त्यात ...
.jpg)
आदित्य-आलिया दिसणार एकत्र?
२ १४ ला रिलीज झालेला हॉलिवूड रोमँटिक चित्रपट ‘द फॉल्ट इन अवर स्टार्स’ याचा हिंदी रिमेक लवकरच येणार असून, त्यात आदित्य रॉय कपूर आणि आलिया भट्ट हे हॉट कपल एकत्र दिसणार आहेत. ते प्रथमच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करणार आहेत. दोन वर्षांपासून चित्रपटाच्या निर्मितीचे काम हाती घेण्यात आले आहे. लवकरच चित्रपटाचे शूटिंग देखील सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांकडून कळतेय.
सूत्रांनुसार, आलिया भट्ट आणि आदित्य रॉय कपूर हे दोघे जण पहिल्यापासूनच दिग्दर्शकांची पहिली पसंती होते. आलियाला तिची व्यक्तीरेखा खूप आवडली होती. ती नुकतीच आदित्य रॉय कपूरच्या ‘ओके जानू’ मधील परफॉर्मन्समुळे प्रचंड खुश झालीय. त्यामुळे आता केव्हा चित्रपटाचे शूटिंग सुरू होते असे तिला झाले आहे. प्रॉडक्शन हाऊसने आदित्यकडे मुख्य भूमिकेचा प्रस्ताव ठेवला आहे. जून-जूलै २०१७ पर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरू होणार यात काही शंकाच नाही.
जॉन ग्रीन यांच्या कादंबरीवर आधारित हॉलिवूडपटात शेलेने वुडले आणि अंसेल एल्गॉर्ट यांच्या मुख्य भूमिका आहेत. कॅन्सरग्रस्त रूग्णाच्या आयुष्यात एक ग्रुप येतो अन् त्याचं आयुष्य कसं बदलून जातं या कथानकावर आधारित हिंदी रिमेक चित्रपट असल्याचे सूत्रांकडून कळतेय.