क्रितीला बघून फोटोग्राफर म्हणाला,'जय श्री राम', अभिनेत्री सुधारली त्याची 'ती' चूक, म्हणाली....
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 14:14 IST2023-05-10T14:09:32+5:302023-05-10T14:14:07+5:30
आदिपुरुषच्या ट्रेलर लॉन्च पूर्वीचा क्रिती सेननचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

क्रितीला बघून फोटोग्राफर म्हणाला,'जय श्री राम', अभिनेत्री सुधारली त्याची 'ती' चूक, म्हणाली....
प्रभास, क्रिती सेनन, सनी सिंग आणि सैफ अली खान स्टारर 'आदिपुरुष' (Adipurush Trailer) या चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरला खूप पसंती दिली जात आहे. प्रेक्षकांकडून कौतुक होत आहे. सिनेमात क्रिती सेनन जानकीच्या रुपात दिसत आहे तर प्रभास प्रभू श्रीरामाच्या भूमिकेत आहे. ट्रेलर लॉन्च पूर्वीचा क्रिती सेननचा एका व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ज्यात क्रितीला पाहून फोटोग्राफर 'जय श्री राम' म्हणताना दिसतेय.
या व्हिडिओमध्ये क्रिती सेनन थिएटरमध्ये एंट्री असताना, एक पापाराझी तिला पाहतो आणि 'जय श्री राम' म्हणतो. हे ऐकून अभिनेत्री तिचे डोळे दाखवते आणि नंतर त्याची चूक सुधारते. ती फोटोग्राफरच्या 'जय श्री राम' ला 'जय सिया राम' ने उत्तर देते आणि हसत निघून जाते.
क्रिती सेननच्या या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, "जय श्री रामच्या उत्तरात जय सिया राम... मला ते आवडले." एका यूजरने तिच्या साडी लुकचे कौतुकही केले. युजरने लिहिले, “तू साडीत सुंदर दिसत आहेस.
आदिपुरुष ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये क्रिती सेनन म्हणाली, “आज मी खूप भावूक झालो आहे, ट्रेलर पाहून मला आनंद झाला कारण हा फक्त एक चित्रपट नाही, तर त्यापेक्षा खूप काही आहे. हा चित्रपट बनवताना आम्ही जे अनुभवले ते खूप खास होते.
'आदिपुरुष'चा ट्रेलर चाहत्यांच्या पसंतीस पडला असून मोठ्या पडद्यावर सिनेमा बघण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. १६ जून रोजी चित्रपट प्रदर्शित होत आहे. हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाच भाषांमध्ये सिनेमा रिलीज होत आहे.