अदा शर्माने नेसली फक्त १५ रुपयांची साडी! साडीमागची कहाणी वाचून तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2024 10:06 IST2024-04-03T10:04:40+5:302024-04-03T10:06:05+5:30

अदा शर्माचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात तिने फक्त १५ रुपयांची साडी नेसली आहे

Adah Sharma wore a saree of only 15 rupees read the facts behind adah 15 rupees saree | अदा शर्माने नेसली फक्त १५ रुपयांची साडी! साडीमागची कहाणी वाचून तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक

अदा शर्माने नेसली फक्त १५ रुपयांची साडी! साडीमागची कहाणी वाचून तुम्हीही कराल अभिनेत्रीचं कौतुक

'द केरळ स्टोरी', 'बस्तर' अशा सिनेमांमधून बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा चाहता वर्ग निर्माण करणारी अभिनेत्री म्हणजे अदा शर्मा. अदा विविध ठिकाणी पार्टी, इव्हेंटला जाताना दिसते. अदा अनेकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते. अशातच अदाबद्दल एक खास गोष्ट समोर आलीय. अदा एका इव्हेंटमध्ये नुकतंच फक्त १५ रुपयांची साडी नेसून आली होती. अदाच्या या साडीमागचं कनेक्शन जाणून तुम्हालाही आनंद होईल.

अदाने नेसलेल्या फक्त १५ रूपयांच्या साडीमागचं रहस्य काय आहे? तर... अनेकांना प्रश्न पडला असेल की अदाने इतकी स्वस्तातली साडी कुठुन आणली. तर त्यामागचं उत्तर असं, अदाने तिच्या आजीची (आईची आई) साडी नेसली आहे. तिच्या आजीने त्या काळात फक्त १५ रुपयांना ती साडी खरेदी केली होती. साडीची किंमत कमी असली तरीही अदासाठी ही साडी मौल्यवान आहे.

अदाने गेली अनेक वर्ष आजीची ही साडी जपून ठेवली आहे. अदा या साडीत प्रचंड सुंदर दिसत आहे. इतकंच नव्हे, पापाराझींना या साडीमागची कहाणी समजताच त्यांनीही तिचं कौतुक केलं. अदाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं तर.. तिची भूमिका असलेला 'बस्तर' सिनेमा काहीच दिवसांपुर्वी रिलीज झाला. या सिनेमाला बॉक्स ऑफीसवर कमी प्रतिसाद मिळाला.

Web Title: Adah Sharma wore a saree of only 15 rupees read the facts behind adah 15 rupees saree