Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2024 10:39 IST2024-10-20T10:38:49+5:302024-10-20T10:39:16+5:30

सुशांतसिंह राजपूतने बांद्रा येथील राहत्या घरात आत्महत्या केली होती. तिथएच आता अदा शर्मा राहत आहे.

Adah Sharma had to go to the court before shifting in Sushant Singh Rajput s house | Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...

Adah Sharma: सुशांतच्या फ्लॅटमध्ये शिफ्ट होण्यासाठी अदा शर्माला माराव्या लागल्या कोर्टात चकरा, म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री अदा शर्मा (Adah Sharma)  'द केरळ स्टोरी' (The Kerala Story) सिनेमामुळे प्रसिद्धीझोतात  आली. त्याआधी अदाने '1920' या हॉरर सिनेमातही काम केलं होतं. तसंच 'हँसी तो फँसी' सिनेमातही ती दिसली होती. 'द केरळ स्टोरी' हिट झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गात वाढ झाली. काही दिवसांपूर्वीच अदा सुशांतसिंह राजपूतच्या घरात शिफ्ट झाल्याची बातमी आली. सुशांतने बांद्रा येथील त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती त्याच घरात अदा सध्या भाड्याने राहत आहे. या घरात शिफ्ट होण्यासाठी तिला कोर्टाच्या चकरा माराव्या लागल्या अशी चर्चा आहे.

'जागरण'ला दिलेल्या मुलाखतीत अदा शर्माला प्रश्न विचारण्यात आला की वैयक्तिक आयुष्यात कधी कोर्टात जावं लागलं आहे का? यावर अदा म्हणाली, "कोणताही प्रोजेक्ट साईन करण्याआधी करावा लागणारा कॉन्ट्रॅक्ट आधी वकील वाचतात. त्यामुळे वकीलांशी तर माझा रोज सामना होतो. तसंच घरात शिफ्ट झाल्यानंतर त्याच्या कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मला कोर्टात जावं लागलं होतं. ते काम घरबसल्या ऑनलाईनही होऊ शकत होतं पण माझ्या ब्रोकरच्या सांगण्यावरुन मी कोर्टात जाऊन कागदपत्रांवर सही केली. याआधी माझ्या कुटुंबातील काही जणांच्या कोर्ट मॅरेजसाठीही मी गेले आहे."


अदा शर्माची हॉटस्टारवर 'रीता सान्याल' सीरिज रिलीज झाली आहे. सध्या ती इंडस्ट्रीत मिळणारं यश एन्जॉय करत आहे. मात्र सुशांतच्या घरात शिफ्ट झाल्यानंतर तिच्यावर काहींनी टीकाही केली होती. आपण सुशांतच्या घरात खूप खूश असल्याचं तिने सर्वांना उत्तर दिलं.  

Web Title: Adah Sharma had to go to the court before shifting in Sushant Singh Rajput s house