अदा शर्मा म्हणतेय, विद्युतची अ‍ॅक्शनच नाही तर माझ्याही अदा बघा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2017 22:21 IST2017-03-03T16:51:08+5:302017-03-03T22:21:08+5:30

‘१९२०’ या सिनेमात बघावयास मिळालेली अभिनेत्री अदा शर्मा हिला ‘कमांडो-२’ या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहे. अदा स्वत:ला बॉलिवूडमध्ये एका ...

Ada Sharma says, if there is no act of electricity, see my pay! | अदा शर्मा म्हणतेय, विद्युतची अ‍ॅक्शनच नाही तर माझ्याही अदा बघा!

अदा शर्मा म्हणतेय, विद्युतची अ‍ॅक्शनच नाही तर माझ्याही अदा बघा!

९२०’ या सिनेमात बघावयास मिळालेली अभिनेत्री अदा शर्मा हिला ‘कमांडो-२’ या सिनेमाकडून भरपूर अपेक्षा आहे. अदा स्वत:ला बॉलिवूडमध्ये एका उंचीवर बघू इच्छित असून, ‘कंमाडो-२’ मधून तिला निदान एक मैलाचा दगड पार करायचा आहे. यासाठी तिने चक्क प्रेक्षकांनाच साकडे घातले असून, विद्युत जामवाल याच्या अ‍ॅक्शनबरोबरच माझ्या अदाही बघा, असे ती म्हणाली आहे. 

२००८ मध्ये ‘१९२०’ मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अदा त्यानंतर ‘हंसी तो फंसी’ आणि ‘हम है राही कार के’ या सिनेमांमध्ये झळकली होती. मात्र तिला यातून फारशे यश आले नाही. आता तिला कंमाडो-२ मधून भरपूर अपेक्षा असून, हा सिनेमा तिच्या करिअरला कलाटणी देणारा ठरेल असे तिला वाटत आहे. या सिनेमात तिने एका मॉर्डन मुलीची भूमिका साकारलेली आहे. अदाला जेव्हा विद्युत जामवाल याच्या अ‍ॅक्शनविषयी विचारण्यात आले तेव्हा तिने स्वत:च्या भूमिकेचे अधिक कौतुक केले. ती म्हणाली की, ‘१९२०’ मध्ये रजनीश दुग्गल याची दमदार भूमिका होती, परंतु अशातही प्रेक्षकांनी माझी भूमिका पसंत केली. ‘कमांडो-२’ मध्ये माझी भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने दाखविण्यात आली आहे. जेव्हा मला या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकविण्यात आली होती तेव्हा मी त्यास लगेचच होकारही दिला होता. त्यामुळेच या सिनेमातील माझी भूमिका प्रेक्षकांना पसंत येईल, असेही तिने सांगितले. 



अदा शर्मा आणि विद्युत जामवाल सध्या ‘कमांडो-२’ च्या प्रमोशनसाठी जागोजागी फिरत आहेत. नुकतीच अदा विद्युतबरोबर एका आर्मी कॅँपमध्ये गेली होती. त्याठिकाणी तिने सैनिकांबरोबर डान्सही केला होता. या सिनेमात अदाने सर्व अ‍ॅक्शन सिन्स हाय हिल्समध्ये केलेले आहेत. तिच्या अ‍ॅक्शन सीन्सविषयी अदा म्हणतेय की, होय, सिनेमात मी खरोखरच सर्व अ‍ॅक्शन सीन्स हाय हिल्समध्ये केलेले आहेत. खरं तर स्क्रिप्टच्या डिमांडनुसार मी हे धाडस केले आहे. त्यामुळे माझी अ‍ॅक्शनही प्रेक्षकांना भावेल अशी अपेक्षा अदाने व्यक्त केली. 

Web Title: Ada Sharma says, if there is no act of electricity, see my pay!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.