सावळ्या रंगावरून ‘या’ अभिनेत्रीची निर्मात्यांनी केली हकालपट्टी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2017 19:06 IST2017-09-26T13:08:21+5:302017-09-26T19:06:32+5:30

चित्रपटसृष्टीत विशेषत: बॉलिवूडमध्ये गोरा रंग याविषयी बरेचसे विचित्र समज आहेत. त्यामुळेच वेळोवेळी सावळा अन् गोरा रंगावरून इंडस्ट्रीत वादंग निर्माण ...

'The' actress's creators kaye expelled from saga. | सावळ्या रंगावरून ‘या’ अभिनेत्रीची निर्मात्यांनी केली हकालपट्टी!!

सावळ्या रंगावरून ‘या’ अभिनेत्रीची निर्मात्यांनी केली हकालपट्टी!!

त्रपटसृष्टीत विशेषत: बॉलिवूडमध्ये गोरा रंग याविषयी बरेचसे विचित्र समज आहेत. त्यामुळेच वेळोवेळी सावळा अन् गोरा रंगावरून इंडस्ट्रीत वादंग निर्माण झाले आहे. आता पुन्हा असाच काहीसा प्रकार समोर येत असून, यावेळेस ही अभिनेत्री त्यास बळी पडली आहे. होय, शहाना गोस्वामी असे तिचे नाव असून, तिने आपण वर्णभेदाला बळी पडल्याचे सांगितले. शहानाने म्हटले की, एकदा माझी केवळ सावळ्या रंगामुळे चित्रपटातून हकालपट्टी करण्यात आली. शहानाच्या या आरोपामुळे इंडस्ट्रीत खळबळ उडाली असून, पुन्हा एकदा रंगवाद उफाळून आला आहे. 

शहाना गोस्वामी हिने रॉक आॅन, रा-वन, मिडनाइट चिल्ड्रन, फिराक आणि हिरोइन आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. बीबीसीशी बोलताना शहानाने म्हटले की, माझा एक मित्र चित्रपट बनवित होता. ज्यामध्ये दोन अभिनेत्रींची गरज होती. पहिल्या अभिनेत्रीची निवड करण्यात आली होती. दुसरीचा शोध सुरू होता. अशात दिग्दर्शकांनी माझे नाव पुढे केले. परंतु निर्मात्यांनी मला स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यांच्या मते, अगोदरच पहिली अभिनेत्री सावळी असल्याने, दुसºया सावळ्या अभिनेत्रीची गरजच काय?



यावेळी शहानाने सांगितले की, या किस्स्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, अजूनही लोकांच्या मनात रंगावरून भेदभावाची भावना आहे. सद्यस्थितीत इंडस्ट्रीत ज्या काही टॉप अभिनेत्री आहेत, त्यांच्यात सर्व रंग भरलेले आहेत. थोडक्यात तुम्ही एका निश्चित उंचीवर पोहोचले की, तुम्हाला कुठल्याही प्रकारे रंगावरून अडचण येणार नाही. मात्र तुम्ही जर इंडस्ट्रीत नवे असाल तर तुम्हाला पावलोपावली याचा सामना करावा लागणार आहे. एक काळ असा होता की, सर्व अभिनेत्री गोºया रंगाच्या होत्या. मात्र आता हा ट्रेंड संपला आहे. मला असे वाटते की, सावळा आणि गोºया रंगावरून होत असलेल्या भेदभावावर चर्चा व्हायला हवी. जेणेकरून जे लोक अशाप्रकारची मानसिकता ठेवून इंडस्ट्रीत त्यांच्यात परिवर्तन होऊ शकेल, असेही शहाना म्हणाली. 

विदेशी चित्रपटांमध्ये झळकलेल्या शहानाचे म्हणणे आहे की, विदेशात भारतीयांच्या रंग, रुपाचे खूप आकर्षण आहे. अशात आपल्याकडेच असा भेदभाव का? असा प्रश्न तिला सतावत असल्याचेही तिने सांगितले. शहाना आगामी ‘तू मेरा संडे हैं’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट ६ आॅक्टोबर रोजी रिलीज होणार आहे. मिलिंद धैमदे दिग्दर्शित हा चित्रपट महिला खेळाडूंवर आधारित आहे. याविषयी बोलताना शहानाने सांगितले की, वाढत्या वयात कोणीही खेळात रोल मॉडेल नव्हते. आता बºयाचशा महिला खेळाडू रोल मॉडेल बनल्या आहेत. 

Web Title: 'The' actress's creators kaye expelled from saga.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.