फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती ही अभिनेत्री, सक्सेसनंतर स्वतःला गिफ्ट केलं ५ कोटींचं घर
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 15:59 IST2019-06-13T15:58:30+5:302019-06-13T15:59:11+5:30
बॉलिवूडची अभिनेत्री मुंबईत करियर करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्याकडे फक्त पाचशे रुपये होते.

फक्त ५०० रुपये घेऊन मुंबईत आली होती ही अभिनेत्री, सक्सेसनंतर स्वतःला गिफ्ट केलं ५ कोटींचं घर
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनीचा आज वाढदिवस आहे. ती २६ वर्षांची झाली आहे. टायगर श्रॉफची गर्लफ्रेंड दिशा पाटनी नेहमीच आपल्या बोल्डनेसमुळे चर्चेत असते. नुकताच दिशाचा भारत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगले कलेक्शन केले आहे. दिशाच्या वाढदिवसानिमित्त तिचे काही खास किस्से जाणून घ्या.
दिशाने बॉलिवूडमध्ये सुशांत सिंग राजपूतसोबत एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरीमधून पदार्पण केले होते. या चित्रपटात भलेही तिचा छोटा रोल होता पण तरीदेखील रसिकांच्या चांगलीच लक्षात राहिली. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी दिशाने तेलगू चित्रपट लोफरमध्ये काम केले होते. त्यानंतर तिने एक म्युझिक व्हिडिओ करून बॉलिवूडमधील करियरला सुरूवात केली.
दिशा पटानी एक उत्तम डान्सर असून तिचे रणबीर कपूरवर खूप मोठे क्रश होते. दिशा दररोज शाळेत जाताना आपल्या स्कुटीने त्याच रस्त्याने जायची जिथे रणबीरचे पोस्टर लागलेले असायचे. त्या पोस्टरकडे ती मागे वळून वळून पहायची. याच गडबडीत एकदा तिचा अपघात होता होता बचावली.
टायगर श्रॉफच्या आधी दिशा टेलिव्हिजनवरील अभिनेता पार्थ समथानला डेट करत होती. ते दोघे जवळपास एक वर्षांहून अधिका काळ रिलेशनशीपमध्ये होते. तेव्हा दिशा एवढी सक्रीय नव्हती. त्यावेळी पार्थ टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील लोकप्रिय कलाकार होता. त्यानंतर ते दोघे वेगळे झाले. त्या दोघांचे ब्रेकअप होण्यामागचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.
दिशा जेव्हा मुंबईत करियर करण्यासाठी आली होती. त्यावेळी तिच्याकडे फक्त पाचशे रुपये होते. मात्र आता तिचे स्वतःचे वांद्रे येथे घर आहे. हे अपार्टमेंट तिने २०१७ साली स्वतःला गिफ्ट केले आहे. दिशानं या घराचं नाव लिटिल हट असं ठेवले आहे. या घराची किंमत ५ कोटी रुपये इतकी आहे.