फरदीन खानसोबत चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री आता बनली शिक्षिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 16:42 IST2018-03-05T11:12:13+5:302018-03-05T16:42:13+5:30
बॉलिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवनवीन चेहरे आपले भाग्य आजमवण्यासाठी येत असतात. त्यातील काहीजण या झगमगत्या दुनियेत टिकून राहातात तर काही ...
.jpg)
फरदीन खानसोबत चित्रपटात झळकलेली ही अभिनेत्री आता बनली शिक्षिका
ब लिवूडमध्ये दरवर्षी अनेक नवनवीन चेहरे आपले भाग्य आजमवण्यासाठी येत असतात. त्यातील काहीजण या झगमगत्या दुनियेत टिकून राहातात तर काही जण काहीच चित्रपट करून या लाइम लाइट पासून दूर जातात. एखाद-दुसरा चित्रपट केल्यानंतर बॉलिवूडमधून गायब झालेले अनेक कलाकार आहेत. पण काही कलाकार त्यांच्या अभिनयामुळे नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहातात. फरदीन खानच्या पहिल्या चित्रपटात झळकलेली अभिनेत्री अशीच काही चित्रपट करून अभिनय क्षेत्रापासून दूर गेली.
फरदीन खानच्या प्रेम आंगन या पहिल्या चित्रपटात मेघना कोठारी ही त्याची नायिका होती. या चित्रपटातील भूमिकेसाठी फरदीनला सर्वोत्तम नवोदित कलाकाराचा पुरस्कार मिळाला होता. या चित्रपटातील मेघना कोठारीच्या भूमिकेची देखील चर्चा झाली होती. फरदीन खान सध्या चित्रपटात काम करत नसला तरी चित्रपटसृष्टीतील पार्ट्यांमध्ये तो दिसून येतो. पण त्याच्या प्रेम आंगन या चित्रपटातील नायिका मेघना कोठारी ही लाइमलाईटपासून गेल्या कित्येक वर्षांपासून दूर आहे. तिने गुरिंदर चड्डाच्या ब्राईड अँड प्रिज्युडिस या चित्रपटात देखील काम केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून मेघना चित्रपटात काम करत नाहीये. तिचे लग्न झाले असून आता तिला मुलगा देखील आहे.
![Meghna Kothari]()
पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमध्ये मेघना मुलांना अनेकवेळा शिकवायला येते. तिचे लग्न संदीप चॅटर्जी यांच्यासोबत झाले असून ते फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधील डायरेक्शन आणि स्क्रीनरायटिंग विभागाचे प्रमुख आहेत. लग्नानंतर अनेक वर्षं संदीप आणि मेघना हे पुण्यातच राहात होते. पण गेल्या काही महिन्यांपासून मेघना ग्रेटर नोयडा मध्ये तिच्या आईसोबत राहात आहे तर संदीप यांना कामानिमित्त पुण्यातच राहावे लागत आहे. त्यांचा मुलगा हा आता नऊ वर्षांचा झाला असून तो त्याच्या आईसोबतच नोएडा मध्ये राहातो. मेघना नोएडामध्ये फिल्म मेकिंगचे कोर्स घेते. मेघना ही प्रसिद्ध अभिनेत्री रिटा गांगुली यांची मुलगी आहे.
मेघना ही लाईम लाइटपासून दूर आपले आयुष्य अतिशय आनंदात घालवत आहे. ती अभिनय करत नसली तरी मुलांना अभिनयाचे धडे देत आहे.
Also Read : फरदीन खानच्या तान्हुल्याचा पहिला फोटो! खास तुमच्यासाठी!!