ही अभिनेत्री 16 व्या वर्षीच बनली होती 5 मुलांची आई,या कारणामुळे करावे लागले होते भावोजीसोबतच लग्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2018 17:49 IST2018-01-09T12:19:56+5:302018-01-09T17:49:56+5:30
आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखीच होते असे नाही.अनेक चढ -उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करत आलेल्या समस्येतून मार्ग काढत ...

ही अभिनेत्री 16 व्या वर्षीच बनली होती 5 मुलांची आई,या कारणामुळे करावे लागले होते भावोजीसोबतच लग्न
आ ुष्यात प्रत्येक गोष्ट मनासारखीच होते असे नाही.अनेक चढ -उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात. त्यांचा सामना करत आलेल्या समस्येतून मार्ग काढत आयुष्य पुढे नेत राहणे यापलिकडे दुसरा कोणताही पर्याय नसतो. मग तो सामान्य असो किंवा मग सेलिब्रेटी प्रत्येकाच्या वाट्याला संघर्ष हा असतोच.असा काहीसा संघर्ष या अभिनेत्रीच्याही वाट्यालाही आला.अवघ्या 16 व्या वर्षीच आपल्या भावोजीसोबत लग्न करत संसार थाटावा लागला.इतकेच काय तर त्यांच्या तीन मुलांची आई बनत त्यांची जबाबदारी स्विकारली. ती अभिनेत्री आहे 'मेरे जीने की वजह' या आगामी चित्रपटात झळकणारी अभिनेत्री काजल कुशवाहा.बहिणीच्या निधनामुळे काजलला कमी वयातच भावोजीसबोत लग्न करावे लागले.मात्र त्यावेळी तिच्या कुटुंबाने देखील काजलच्या इच्छेचा विचार न करता तिचे लग्न वयाने 13 वर्षाने मोठ्या असलेल्या भावोजीसोबतच लावून देण्यात आले.काजलला या लग्नाविषयी तिचे मत न विचारताच लग्न लावण्यात आले. अखेर वाट्याला आलेल्या गोष्टींचा स्विकार करत काजलनेही लग्न करण्यातच आपले हित समजले.लग्नानंतर राजेश यांच्या तीन मुलांची आई बनली शिवाय स्वतःचीसुद्धा दोन मुले झाली. इतरांप्रमाणे काजलचीही खूप मोठं स्वप्न होती.मात्र जबाबदारी डोळ्यासमोर असल्यामुळे तिने पाहिलेली सगळी स्वप्न होत्याची नव्हती झाली. लग्नानंतर सुरुवातीच्या दिवसांत पतीसोबत सतत खटके उडायचे. तुमच्याशी लग्न करुन आयुष्य उद्धवस्त झाले, आयुष्यात काहीच करु शकले नाही, असे तिला सतत जाणवायचे.''मात्र संधी ही कधी आणि कशी मिळेल सांगता येत नाही.अगदी त्याचप्रमाणे मुलगी डान्स शिकत असलेल्या डान्स अॅकॅडमीत तिची भेट मॉडेलिंग प्रोग्राम ऑर्गेनाइजरशी झाली. त्यांनीच तिला कार्यक्रमात रॅम्प वॉक करण्याची संधी दिसली."आणि त्या एका रॅम्पवॉकने काजलचे संपूर्ण आयुष्यच पालटले. तिथुनच तिचे करिअरला एक नवीन दिशा मिळणार होती कदाचित काजलाही याची कल्पना नसावी.मिळालेल्या संधीचे सोनं करत काजलनेही बेस्ट देण्याचा प्रयत्न केला आणि रॅम्पवॉकनंतर एक वेगळाच आत्मविश्वास तिच्यात निर्माण झाला.जिद्द,मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिला 'मेरे जीने की वजह' या सिनेमातही संधी मिळाली.लवकरच हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.
![]()