​विनोद खन्ना यांच्यामागे ही अभिनेत्री झाली होती वेडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2017 15:08 IST2017-04-27T09:38:18+5:302017-04-27T15:08:18+5:30

विनोद खन्ना यांना बॉलिवूडमधील सगळ्यात हॅडसम हिरोंपैकी एक मानले जात असे. त्यांच्या मागे सामान्य मुली तर वेड्या होत्या. पण ...

Actress Vinod Khanna was the actress behind | ​विनोद खन्ना यांच्यामागे ही अभिनेत्री झाली होती वेडी

​विनोद खन्ना यांच्यामागे ही अभिनेत्री झाली होती वेडी

नोद खन्ना यांना बॉलिवूडमधील सगळ्यात हॅडसम हिरोंपैकी एक मानले जात असे. त्यांच्या मागे सामान्य मुली तर वेड्या होत्या. पण त्याचसोबत अनेक अभिनेत्रीदेखील या हँडसम अभिनेत्याच्या प्रेमात पडल्या होत्या. अभिनेत्री अमृता सिंग तर त्यांच्यामागे वेडी झाली होती असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही.
अमृता सिंग आणि विनोद खन्ना जे.पी.दत्ता यांच्या बटवारा या चित्रपटात काम करत असताना अमृता विनोद यांच्या प्रेमात पडली. खरे तर त्यावेळी तिचे अफेअर क्रिकेटर रवी शास्त्रीसोबत सुरू होते. पण रवीला चिडवण्यासाठी ती विनोद खन्नाला आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असे. पण सुरुवातीच्या काळात विनोद यांनी अमृताकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. विनोद अमृताला भाव देत नाही हे पाहिल्यावर रवी शास्त्री यावरून अमृताची टरदेखील खेचत असत. ही द्राक्षे खूपच आंबट आहेत असे अमृताला ते म्हणत असत. पण अमृता ही स्वभावाने खूप हट्टी होती. त्यामुळे काहीही झाले तरी विनोद यांचे मन जिंकायचे असे तिने ठरवले आणि त्यांच्यासोबत तिने खूप चांगली मैत्री केली. विनोददेखील काही काळानंतर अमृतावर फिदा झाले. त्यांची प्रेमकथा त्यावेळी मीडियात चांगलीच गाजली होती. अमृता आणि विनोद यांच्यामध्ये अनेक वर्षांचे अंतर होते. अमृताच्या आईला विनोद आणि अमृता यांच्या नात्याबद्दल कळल्यानंतर त्यांनी यासाठी विरोध केला. विनोद हे जवळजवळ तिच्या आईच्या वयाचे होता आणि त्यांचे लग्न झाले असून त्यांना दोन मुलेदेखील होती. अमृताच्या आईच्या हे लक्षात आल्यावर तिने आपल्या मुलीला विनोद यांच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. विनोद हे देखील नात्याबद्दल तितके गंभीर नसल्याने त्यांनी अमृतासोबत ब्रेकअप केले. 



Web Title: Actress Vinod Khanna was the actress behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.