Video: फॅशनच्या नावाखाली हा काय प्रकार? उर्फी जावेदने चक्क केकपासून बनवला ड्रेस, पापाराझींनाही खायलाही दिला
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 10:18 IST2026-02-26T10:14:12+5:302026-02-26T10:18:42+5:30
उर्फीने चक्क केकपासून तिचा ड्रेस बनवला आहे. या ड्रेसमधून केकचा छोटासा तुकडा कापून उर्फीने तो पापाराझींना भरवला आहे. उर्फीची ही फॅशन पाहून सर्वांचा आ वासला होता.

Video: फॅशनच्या नावाखाली हा काय प्रकार? उर्फी जावेदने चक्क केकपासून बनवला ड्रेस, पापाराझींनाही खायलाही दिला
बॉलिवूड अभिनेत्री उर्फी जावेद अजब गजब फॅशन करताना दिसते. कधी खेळण्यांपासून, कधी पत्र्यापासून, कधी पानाफुलांपासून उर्फी जावेद ड्रेस बनवते आणि ते परिधान करते. उर्फीने अशीच एक विचित्र फॅशन केलीये. जी पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. उर्फीने चक्क केकपासून तिचा ड्रेस बनवला आहे. या ड्रेसमधून केकचा छोटासा तुकडा कापून उर्फीने तो पापाराझींना भरवला आहे. उर्फीची ही फॅशन पाहून सर्वांचा आ वासला होता.
केकपासून ड्रेस बनवला, सर्वांना खायलाही दिला
एका इव्हेंटमध्ये उर्फी जावेद अशा एका ड्रेसमध्ये दिसली जो हुबेहूब एका मोठ्या केकसारखा दिसत होता. हा ड्रेस केवळ डिझाइनपुरता मर्यादित नव्हता, तर त्यावर खाण्यायोग्य केकचे लेअर्स आणि क्रीम लावल्याचे दिसून येत होते. या ड्रेसमध्ये उर्फीला चालणे देखील कठीण जात होते, पण नेहमीप्रमाणे तिने आत्मविश्वासाने पापाराझींसमोर पोझ दिल्या. याशिवाय केकच्या ड्रेसमधून चमच्याने काही तुकडे काढून उर्फीने उपस्थित मीडियापैकी काही जणांना तो केक खायलाही दिला.
उर्फीचा हा व्हिडिओ व्हायरल होताच सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस पडला आहे. एका युजरने म्हटले की, "आता फक्त हेच बघायचं बाकी होतं, हिने तर अन्नाचा अपमान केला आहे." तर दुसऱ्याने गंमतीत विचारले, "हा ड्रेस कापून खायचा का?" काही नेटकऱ्यांनी तर "फॅशनच्या नावाखाली काहीही काय चाललंय?" असा सवाल उपस्थित करत उर्फीच्या विचित्र फॅशनवर पुन्हा निशाणा साधला आहे.