48 वर्षांच्या या अभिनेत्रीला अचानक येऊ लागलेत लग्नाचे प्रस्ताव, हे आहे कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 16:26 IST2019-08-07T16:25:22+5:302019-08-07T16:26:58+5:30

होय, 48 वर्षांच्या या अभिनेत्रीसमोर अनेकांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. याचे कारण म्हणजे, तिचा एक फोटो.

actress tabu gets marriage proposals on social media after this photo of hers | 48 वर्षांच्या या अभिनेत्रीला अचानक येऊ लागलेत लग्नाचे प्रस्ताव, हे आहे कारण

48 वर्षांच्या या अभिनेत्रीला अचानक येऊ लागलेत लग्नाचे प्रस्ताव, हे आहे कारण

ठळक मुद्देतब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले.

चांदणी बार, माचिस अशा अनेक हिट चित्रपटांची नायिका तब्बू सध्या एका वेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. होय, 48 वर्षांच्या तब्बूसमोर अनेकांनी लग्नाचा प्रस्ताव ठेवला आहे. याचे कारण म्हणजे, तिचा एक फोटो.
तब्बूने नुकतेच एक फोटोशूट केले. यातील एक फोटो पाहून चाहते असे काही फिदा झालेत की, अनेकांनी तिला लग्नासाठी प्रपोज केले.

या फोटोत तब्बू इतकी आकर्षक दिसतेय की, तिचे सौंदर्य पाहून अनेक खल्लास झालेत. मग काय ‘वील यू मॅरी मी’ असे अनेक प्रस्ताव तिला मिळू लागलेत. अनेकांनी तब्बूला ‘आय लव्ह यू’ म्हणत आपले प्रेम व्यक्त केले.

विजयपथ या सिनेमातून फिल्मी करिअर सुरु करणारी अभिनेत्री तब्बू आजही अविवाहित आहे. मी अविवाहित असण्याला अजय देवगण जबाबदार असल्याचे तब्बूने अनेक एका मुलाखतीत सांगितले आहे. ‘ मी आणि अजय आम्ही  25 वर्षांपासून एकमेकांना ओळखतो. अजय हा माझ्या चुलत भावाच्या शेजारी राहत होता. माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून अजय माझ्यासोबत आहे. त्या काळात माझा चुलत भाऊ समीर आणि अजय दोघे सतत माझ्यासोबत असायचे. कुठलाही  मुलगा माझ्यासोबत बोलला तरी हे दोघे त्यांना धमकावत असत. आजही मी अविवाहित ते फक्त अजय देवगणमुळेच. त्याने माझ्यासोबत काय केले या गोष्टीचा अजयला केव्हा तरी नक्कीच पश्चात्ताप होईल, असे तब्बू अलीकडे एका मुलाखतीत म्हणाली होती. 


तब्बू आजही अविवाहित असली तरी तिचे नाव अनेक अभिनेत्यांशी जोडले गेले. संजय कपूर, साजिद नाडियाडवाला आणि नागार्जुन यांच्यासोबत तब्बूच्या अफेअरच्या चर्चा ब-याच रंगल्या.


 

Web Title: actress tabu gets marriage proposals on social media after this photo of hers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tabuतब्बू