सर्वांची लाडकी अभिनेत्री ७ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; मुलाच्या जन्मानंतर इंडस्ट्रीतून घेतलेला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 09:50 IST2025-09-24T09:48:11+5:302025-09-24T09:50:15+5:30
बॉलिवूडमधील सर्वांची लाडकी अभिनेत्री मधल्या काळात इंडस्ट्रीतून गायब होती. आता ही अभिनेत्री सात वर्षांनी बॉलिवूड कमबॅक करण्यास सज्ज आहे

सर्वांची लाडकी अभिनेत्री ७ वर्षांनी करतेय बॉलिवूडमध्ये कमबॅक; मुलाच्या जन्मानंतर इंडस्ट्रीतून घेतलेला ब्रेक
अभिनेत्री सोनम कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. सोनम कपूर सध्या बॉलिवूडमध्ये काम करत नाहीये. मुलाच्या जन्मानंतर सोनमने गेली अनेक वर्ष बॉलिवूडमधून ब्रेक घेतला होता. पण आता जवळपास सात वर्षांनी सोनम पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्याची शक्यता आहे. सोनमने स्वतःच याबद्दल सांगितलं आहे. सोनमने एका मुलाखतीत तिच्या बॉलिवूड कमबॅकबद्दल सर्वांना सांगितलं आहे.
सोनम सात वर्षांनी करणार बॉलिवूड कमबॅक
सोनमने टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, तिला बॉलिवूडमध्ये कमबॅक करायचं आहे. पण सिनेमात फक्त दिसायचं म्हणून तिला काम करायचं नाहीये. तिला अशा कथांमध्ये काम करायचे आहे, ज्या महिला-केंद्रित आहेत आणि ज्या प्रेक्षकांना चांगला संदेश देतील. सात वर्षांच्या ब्रेकनंतर सोनम तिच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग २०२५ च्या अखेरीस सुरु करण्याची शक्यता आहे. या चित्रपटाद्वारे ती पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे.
सोनमने २०१८ मध्ये आनंद आहुजासोबत लग्न केले आणि २०२२ मध्ये तिचा मुलगा 'वायू'चा जन्म झाला. मुलाला वेळ देण्यासाठी तिने चित्रपटांमधून ब्रेक घेतला होता. चित्रपटांपासून दूर असली, तरी सोनम कपूर फॅशन विश्वात खूप सक्रिय होती. ती अलीकडच्या काळात अनेक मोठ्या फॅशन इव्हेंट्समध्ये सहभागी झाली आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील फॅशन जगतात तिने आपलं स्थान कायम राखलं. सोनमचा २०१९ मध्ये 'द झोया फॅक्टर' हा शेवटचा सिनेमा प्रदर्शित झाला होता. यानंतर तिने ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'ब्लाइंड' या प्रोजेक्टमध्ये काम केले.