श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 02:39 PM2022-01-28T14:39:15+5:302022-01-28T14:56:07+5:30

श्रुती हासन(Shruti Haasan)ने टॉलीवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले.

Actress shruti haasan birthday special naga chaitanya once wanted to marry kamal haasan daughter shruti haasan | श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

श्रुती हसनला करायचे होते समांथाच्या एक्स पतीशी लग्न, या छोट्याशा गोष्टीमुळे आले दोघांमध्ये अंतर

googlenewsNext

साऊथचा सुपरस्टार कमल हासन आणि अभिनेत्री सारिका यांची मुलगी श्रुती हासन (Shruti Haasan) आज २८ जानेवारीला तिचा ३६ वा वाढदिवस साजरा करत आहे. 1986 मध्ये जन्मलेली अभिनेत्री श्रुती हासन(Shruti Haasan) ने टॉलीवूडमध्ये तिच्या अभिनय कौशल्याने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केल्यानंतर बॉलिवूडमध्ये आपले नशीब आजमावले. तिने अभिनेता अक्षय कुमारसोबत जॉन अब्राहमसोबत 'गब्बर इज बॅक', 'वेलकम बॅक' सारख्या सिनेमांमध्ये काम केले.

श्रुती हासन तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल, विशेषतः लव्ह लाईफबद्दल देखील खूप चर्चेत आहे. एक काळ असा होता की कमल हसनची मुलगी श्रुतीला सामंथाचा एक्सचा पती नागा चैतन्य(Naga Chaitanya)सोबत लग्न करायचे होते.

समांथा आणि चैतन्य यांच्या लग्नाआधी त्याचे श्रुती हसनसोबत अफेअर होते.चैतन्य आणि कमल हासन यांची मुलगी श्रुती हासन यांच्या अफेअरची चर्चा एकेकाळी मीडियात रंगली होती. त्या दोघांची ओळख 2013 मध्ये एका कॉमन फ्रेंडने करून दिली होती. त्यानंतर ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्या दोघांना सतत एकत्र पाहिले जात असे. ते दोघे लवकरच लग्न करणार अशा बातम्यादेखील सतत मीडियामध्ये येत होत्या. 2013 ला झालेल्या फिल्मफेअर पुरस्काराच्यावेळी तर त्या दोघांच्या जवळकीची चांगली चर्चा रंगली होती.

मात्र त्यानंतर दोघांच्या वेगळं होण्याची बातमी आली. या दोघांच्या विभक्त होण्यामागे श्रुतीची बहीण अक्षराचा असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. खरंतर श्रुती हसन, नागा आणि अक्षराची भेट एका शोदरम्यान झाली होती. श्रुतीला या शोमध्ये परफॉर्म करायचे होते म्हणून तिने नागा चैतन्यला अक्षराला सोडण्यास सांगितले. पण नागा चैतन्यला काही महत्त्वाच्या कामासाठी निघावे लागले आणि तो अक्षराला सोडू शकला नाही. त्यामुळे श्रुतीला राग आला आणि तिने नागा चैतन्यशी बोलणे बंद केले.

मात्र, काही वर्षांनी श्रुती आणि नागा चैतन्य यांची केमिस्ट्री पुन्हा दिसली जेव्हा ते दोघे 2016 मध्ये 'प्रेमम' चित्रपटात एकत्र दिसले होते. पण 2017 मध्ये नागा चैतन्यने समंथासोबत लग्न केले आणि आता लग्नाच्या चार वर्षानंतर दोघेही वेगळे झाले आहेत.
 

Web Title: Actress shruti haasan birthday special naga chaitanya once wanted to marry kamal haasan daughter shruti haasan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.