श्रद्धा कपूरला चाहत्यांनी घेरलं! लोकांना आवरताना बॉडीगार्डला फुटला घाम, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2024 17:47 IST2024-07-02T17:45:36+5:302024-07-02T17:47:44+5:30

श्रद्धा कपूरला पाहण्यासाठी लोकांमध्ये धक्काबुक्की झाली. पुढे लोकांना आवरताना बॉडीगार्डच्या चांगलंच नाकीनऊ आले. व्हिडीओ व्हायरल (shraddha kapoor)

actress Shraddha Kapoor mobbed by fans shocking video viral | श्रद्धा कपूरला चाहत्यांनी घेरलं! लोकांना आवरताना बॉडीगार्डला फुटला घाम, व्हिडीओ व्हायरल

श्रद्धा कपूरला चाहत्यांनी घेरलं! लोकांना आवरताना बॉडीगार्डला फुटला घाम, व्हिडीओ व्हायरल

'आशिकी २', 'स्त्री', 'तू झूठी मेें मक्कार' अशा अनेक बॉलिवूड सिनेमांमधून लोकांचं प्रेम मिळवलेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूरला आपण विविध जाहिरातींमधूनही अभिनय करताना पाहिलंय. श्रद्धा अनेकदा साध्या सोज्वळ अंदाजात वावरताना दिसते. श्रद्धाच्या अशाच स्वभावामुळे तिचं फॅन फॉलोईंग मोठं आहे. पण  नुकताच एक व्हिडीओ समोर आलाय. यात श्रद्धाला तिच्या फॅन्सनी चांगलंच घेरलं असून त्यांना आवरताना बॉडीगार्डला चांगलाच घाम फुटलाय.

श्रद्धा कपूरला पाहण्यासाठी चाहत्यांमध्ये धक्काबुक्की

बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर नुकतीच एका कार्यक्रमासाठी लखनऊला गेली होती. त्यावेळी श्रद्धा आली आहे असं कळताच तिच्या चाहत्यांनी प्रचंड गर्दी केली. हॉटेलच्या बाहेरून एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अभिनेत्रीची फक्त एक झलक पाहण्यासाठी गर्दी नियंत्रणाबाहेर जाताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की श्रद्धा हॉटेलमधून तिच्या कारकडे जाताना दिसते. त्यावेळी मोठ्या जमावाने तिला घेरले. अनेकांनी श्रद्धाशी हात मिळवत तिच्यासोबत फोटो काढण्याचा प्रयत्न केला. श्रद्धाने अनेक तरुण मुलींंना मिठी मारली. स्वतः श्रद्धाने मिठी मारल्याने अनेक मुली भावुक झाल्या. याशिवाय कारमध्ये बसण्यापूर्वी श्रद्धाने सर्वांना हात दाखवत निरोप घेतला.

बॉडीगार्डची लोकांना आवरण्यासाठी उडाली तारांबळ

श्रद्धा जेव्हा अनेक तरुण महिला आणि चाहत्यांशी संवाद साधत असताना तेव्हा मागे लोकांमध्ये धक्काबुक्की झालेली दिसली. जमाव नियंत्रणाबाहेर जात होता. लोकांना  श्रद्धापासून दूर ठेवण्यासाठी बॉडीगार्डची चांगलीच भंबेरी उडालेली पाहायला मिळाली. अशाप्रकारे श्रद्धाला पाहण्यासाठी तिच्या चाहत्यांमध्ये झुंबड  उडाली. श्रद्धा कपूर लवकरच 'स्त्री २' सिनेमातून भेटीला येणार आहे.

Web Title: actress Shraddha Kapoor mobbed by fans shocking video viral