'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राचं ब्रेकअप, कोणाला करत होती डेट माहितीये का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 16:10 IST2026-04-08T16:05:02+5:302026-04-08T16:10:39+5:30

सान्या मल्होत्राच्या आयुष्यात कोण होतं?

actress sanya malhotra breakup she was dating sitar player rishab sharma | 'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राचं ब्रेकअप, कोणाला करत होती डेट माहितीये का?

'दंगल' फेम अभिनेत्री सान्या मल्होत्राचं ब्रेकअप, कोणाला करत होती डेट माहितीये का?

बॉलिवूड अभिनेत्री सान्या मल्होत्रा आणि प्रसिद्ध सतार वादक ऋषभ रिखीराम शर्मा यांच्या नात्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या एका वर्षापासून एकमेकांना डेट करत असलेल्या या जोडीने आता वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी परस्पर सहमतीने नात्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. यांच्या ब्रेकअपच्या बातमीने चाहत्यांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.

हिंदुस्तान टाइम्स रिपोर्टनुसार, सान्या आणि ऋषभ यांनी २०२५ च्या सुरुवातीला एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली होती. मात्र, आता हे नाते संपुष्टात आले असून या दोघांनी सोशल मीडियावर एकमेकांना 'अनफॉलो' देखील केले आहे. इतकेच नव्हे तर, ऋषभ आता दुसऱ्या कोणाला तरी डेट करत असल्याचेही सूत्रांकडून समजते आहे, परंतु त्याने हे नाते सध्या गुपित ठेवले आहे.


विशेष म्हणजे, सान्या आणि ऋषभ यांनी कधीही आपल्या नात्याची जाहीर कबुली दिली नव्हती. ते सार्वजनिक ठिकाणी एकत्र दिसणेही टाळत असत. अनेकदा पापाराझींनी त्यांना एकाच ठिकाणाहून वेगवेगळ्या वेळी बाहेर पडताना पाहिले होते, जेणेकरून त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर येणार नाहीत. आपल्या खाजगी आयुष्याबाबत कमालीची गुप्तता पाळणाऱ्या या जोडीने ब्रेकअपचा निर्णयही तितक्याच गुप्तपणे घेतला आहे.

या दोघांच्या नात्याची चर्चा सर्वप्रथम जानेवारी २०२५ मध्ये सोशल मीडियावर सुरू झाली होती. एका चाहत्याने त्यांचे एकत्र फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये ते एका कार्यक्रमात वेळ घालवताना दिसत होते. डिसेंबर २०२४ मध्येही त्यांना एका कार्यक्रमात एकत्र पाहिल्याचा दावा काही नेटकऱ्यांनी केला होता. सान्या मल्होत्रा सध्या तिच्या आगामी चित्रपटांच्या कामात व्यग्र असून, या ब्रेकअपवर तिने अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

Web Title : 'दंगल' फेम सान्या मल्होत्रा का ब्रेकअप: रिश्ते की जानकारी

Web Summary : 'दंगल' के लिए मशहूर सान्या मल्होत्रा का कथित तौर पर ऋषभ रिखीराम शर्मा के साथ एक साल डेटिंग के बाद ब्रेकअप हो गया है। उन्होंने सोशल मीडिया पर एक-दूसरे को अनफॉलो कर दिया है। सूत्रों का कहना है कि शर्मा अब किसी और को डेट कर रहे हैं, जिसे निजी रखा गया है। दंपति ने कभी भी सार्वजनिक रूप से अपने रिश्ते को स्वीकार नहीं किया।

Web Title : 'Dangal' Fame Sanya Malhotra Breaks Up: Details of Her Relationship

Web Summary : Sanya Malhotra, known for 'Dangal,' has reportedly broken up with Rishab Rikhiram Sharma after a year of dating. They've unfollowed each other on social media. Sources suggest Sharma is now dating someone else, keeping it private. The couple never publicly acknowledged their relationship.