मीडियाच्या पाठलागाला वैतागली ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, आता तरी फोटो काढणं थांबवा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2018 11:49 IST2018-05-27T06:19:54+5:302018-05-27T11:49:54+5:30

आई आपल्या बाळाबद्दल पझेसिव्ह असतेच. मग ती सर्वसाधारण महिला असो किंवा मग ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री. तिच्या बाळावर ज्यांची ...

The actress; Said, stop photographing now! | मीडियाच्या पाठलागाला वैतागली ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, आता तरी फोटो काढणं थांबवा!

मीडियाच्या पाठलागाला वैतागली ‘ही’ अभिनेत्री; म्हणाली, आता तरी फोटो काढणं थांबवा!

आपल्या बाळाबद्दल पझेसिव्ह असतेच. मग ती सर्वसाधारण महिला असो किंवा मग ती बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री. तिच्या बाळावर ज्यांची नजर असेल त्यांना ती कधीतरी फटकारतेच. असंच काहीसं सध्या पतौडी खानदानची बेगम बेबो करिना कपूर खानबरोबर घडताना दिसत आहे. झालं असं की, दररोज तिच्या मुलाचे म्हणजेच तैमूरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट होताना दिसतात. मीडियाने काढलेले तैमूरचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यावर लोक कमेंटस करतात. काहींना ते आवडतातही. मात्र, आता या सगळया गोष्टींना ती जाम वैतागली आहे. ती मीडियाच्या पाठलागाला कंटाळली आहे. ती मीडियाला म्हणते आता तरी तैमूरचे फोटो काढणं थांबवा.’



बॉलिवूडची ‘ए’ ग्रेड अभिनेत्री करिना कपूर खान म्हणाली की, ‘मला आता खरंच वाटू लागले आहे की, प्रसारमाध्यमांनी दररोज तैमुरचे फोटो काढणं आता बंद केलं पाहिजे. तैमुरकडे असणारं प्रसारमाध्यमांचं लक्ष पाहिलं की मन अस्वस्थ होतं आणि एकप्रकारची भिती वाटायला लागते. एक-दोनदा झालं तर समजू शकतो पण दररोज?’ अशा परिस्थितीला करिना कसं तोंड देते हा प्रश्न जेव्हा तिला विचारला तेव्हा करिना म्हणाली की, ‘मी काय करु शकते? माझ्या हातात काहीच नाही. मी त्याला २४ तास घरात तर ठेवू शकत नाही. पण आता गोष्टी हळूहळू बदलत आहेत.’



करिना सध्या तिचा आगामी चित्रपट ‘वीरे दी वेडिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. लवकरच तिचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत सोनम कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तल्सनिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. १ जूनला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तसेच प्रसारमाध्यमांमध्ये माझ्यापेक्षा जास्त तैमुरवर लक्ष दिले जाते या गोष्टीचीही मला भीती वाटते असे करिनाने एका रेडिओ शोमध्ये देखील सांगितले.

Web Title: The actress; Said, stop photographing now!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.