मिथुन चक्रवर्तींची नायिका, 'त्या' सीनमुळे झाला मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 14:17 IST2025-11-07T14:03:57+5:302025-11-07T14:17:57+5:30
चित्रपटातील 'त्या' सीनमुळे झाला अभिनेत्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं?

मिथुन चक्रवर्तींची नायिका, 'त्या' सीनमुळे झाला मानसिक आरोग्यावर परिणाम; कित्येक दिवस झोपली नव्हती, काय घडलेलं?
Bollywood Actress: आपली भूमिका तसंच आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा यासाठी कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. विविध पैलूंचा ते विचार करतात. अनेकदा ते चित्रपटात, आपल्या व्यक्तिरेखेत एवढे गुंतून जातात की, त्या व्यक्तिरेखेतून बाहेर पडणे त्यांना अशक्य होतं. असाच काहीसा प्रकार एका अभिनेत्रीसोबत घडला होता. चित्रपटातील त्या भूमिका अभिनेत्रीच्या इतकी डोक्यात फिट झाली होती की,ते दृश्य तिच्या डोळ्यासमोर यायचे. या अभिनेत्रीचं नाव रितूपर्णा सेनगुप्ता आहे.
रितूपर्णा सेनगुप्ता हे बंगाली सिनेइंडस्ट्रीतील नावाजलेलं नाव आहे. अभिनेत्रीने आजवर अनेक हिंदी, बंगाली भाषेतील चित्रपटांमध्ये काम केलं आहे. प्राक्तन, अलिक सुख, आलाप, जियो काका यांसारख्या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांचं आजही तितकंच बोललं जातं. रितूपर्णाने बंगाली चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यानंतर हिंदी चित्रपटांकडे आपला मोर्चा वळवला. तिसरा कौन या चित्रपटाद्वारे तिने बॉलिवूड मध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात अभिनेते मिथून चक्रवर्ती प्रमुख भूमिकेत होते. त्यानंतर अभिनेत्री दहन या चित्रपटात दिसली. या चित्रपटासाठी तिला अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आलं. मात्र, हा चित्रपटामुळे अभिनेत्रीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला.
एका मुलाखतीत रितूपर्णा यांनी सांगितलं होतं की, या चित्रपटातील एक सीन काहीही केल्या त्यांच्या आठवणीतून जात नाही. तो सीन आठवून मी अनेकवेळा घाबरून उठायला होतं. दहन चित्रपटातील दृश्यात अभिनेत्रीवर एक बलात्काराचा सीन चित्रित करण्यात आला होता.त्यावेळी शूटिंग करत असताना या चित्रपटाच्या टीमला सुद्धा टेन्शन आलं होतं.पण अॅक्शन म्हटल्यावर रितूपर्णाने खूपच चांगला अभिनय केला.