'सिर्फ तुम'मधून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री अचानक झाली गायब, एका चुकीमुळे बरबाद झालं करिअर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2025 12:07 IST2025-02-05T12:05:54+5:302025-02-05T12:07:48+5:30
ही अभिनेत्री फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल होती आणि बॉलिवूडमध्ये येताच ती प्रसिद्ध झाली, पण लवकरच तिने हार मानली आणि बॉलिवूडमधून गायब झाली.

'सिर्फ तुम'मधून रातोरात स्टार झालेली अभिनेत्री अचानक झाली गायब, एका चुकीमुळे बरबाद झालं करिअर
तरुण-तरुणी रोज नवी स्वप्ने घेऊन स्वप्ननगरी मुंबईत येतात, पण प्रत्येकजण यशस्वी होईलच याची खात्री कोणीही देत नाही. त्यामुळेच काही जण कलाकार होण्यावर ठाम राहतात तर काही आपला मार्ग बदलतात. असे अनेक स्टार्स आहेत जे हिट चित्रपट देऊनही बॉलिवूडमधून गायब झाले आहेत. यापैकी एक नाव म्हणजे एकेकाळी नॅशनल क्रश बनलेली अभिनेत्री प्रिया गिल (Priya Gill). ही अभिनेत्री फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल होती आणि बॉलिवूडमध्ये येताच ती प्रसिद्ध झाली, पण लवकरच तिने हार मानली आणि बॉलिवूडमधून गायब झाली.
प्रिया गिल ही बॉलिवूड अभिनेत्रींपैकी एक आहे जिने फार कमी वेळात प्रेक्षकांची मने जिंकली. तिने आपल्या सौंदर्याची, निरागसतेची आणि मनमोहक हास्याची जादू हिंदी चित्रपटसृष्टीत तसेच दक्षिण चित्रपटसृष्टीत पसरवली. पण तिला हवे तसे यश इंडस्ट्रीत मिळाले नाही.
'तेरे मेरे सपने'मधून बॉलिवूडमध्ये केले पदार्पण
प्रियाने अर्शद वारसीसोबत १९९६ मध्ये 'तेरे मेरे सपने' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, परंतु हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. प्रियाने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान ते सुनील शेट्टी यांसारख्या स्टार्ससोबत काम केले, मात्र काही काळानंतर ती मोठ्या पडद्यावरून गायब झाली. प्रिया गिल आजही 'सिर्फ तुम'मध्ये साकारलेल्या 'आरती'च्या भूमिकेसाठी ओळखली जाते.
बॉलीवूड-साउथ आणि भोजपुरीतही केलं काम
'सिर्फ तुम'मध्ये प्रिया मुख्य भूमिकेत होती, तर सुष्मिता सेनने साइड रोल केला होता आणि संजय कपूर मुख्य नायक होता. चित्रपटातील प्रियाची स्टाईल सर्वांनाच आवडली. याशिवाय प्रिया 'जोश'मध्ये शाहरुख खानसोबत दिसली होती. या चित्रपटातील तिच्या व्यक्तिरेखेची बरीच चर्चा झाली. पण, जेव्हा खूप मेहनत करूनही प्रियाला बॉलिवूडमध्ये अपेक्षित यश मिळू शकले नाही, तेव्हा ती साऊथ सिनेमाकडे वळली.
१० वर्षांची होती सिनेकारकीर्द
प्रिया गिलने मल्याळम चित्रपट 'मेघम' केला, त्यानंतर ती भोजपुरी चित्रपटांमध्येही दिसली. मात्र, प्रियाला बॉलिवूडमध्ये अपेक्षित ते स्थान मिळवता आले नसेल. यानंतरही तिला शाहरुख-सलमानसारख्या स्टार्ससोबत काम करण्याची संधी नक्कीच मिळाली. प्रियाचा बॉलिवूडमधील प्रवास जवळपास १० वर्षे चालला, त्यानंतर ती हळूहळू चित्रपटांमधून गायब होऊ लागली. याशिवाय ती सोशल मीडियावर कुठेही सक्रिय नाही.
आता परदेशात आहे स्थायिक
काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रिया आता परदेशात स्थायिक झाली आहे, मात्र अद्याप याची पुष्टी झालेली नाही. तसेच तिच्या जोडीदाराविषयी किंवा कुटुंबाविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही.