पूजा हेगडेने विकत घेतले  सी-फेसिंग अपार्टमेंट, स्वत: करतेय इंटेरिअर डिझाईन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2021 03:50 PM2021-02-19T15:50:21+5:302021-02-19T17:32:53+5:30

Pooja hegde buys 3 bhk sea facing lavish apartment in mumbai bandra : मिस युनिव्हर्स इंडिया ते बॉलिवूड पर्यंत अभिनेत्री पूजा हेडगे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे.

Actress pooja hegde purchased a sea facing apartment in bandra | पूजा हेगडेने विकत घेतले  सी-फेसिंग अपार्टमेंट, स्वत: करतेय इंटेरिअर डिझाईन

पूजा हेगडेने विकत घेतले  सी-फेसिंग अपार्टमेंट, स्वत: करतेय इंटेरिअर डिझाईन

googlenewsNext

पूजा हेगडेला हिंदी भाषेव्यतिरिक्त तेलगू, इंग्रजी, कन्नड, तमिळ भाषांचेही पूर्ण ज्ञान आहे. साऊथमधील ती एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मिस युनिव्हर्स इंडिया ते बॉलिवूड पर्यंत अभिनेत्री पूजा हेडगे सोशल मीडियावर चांगलीच अ‍ॅक्टिव्ह आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असते. पूजा सध्या एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.  पूजाने वांद्रेमध्ये ३ बीएचके सी-फेसिंग अपार्टमेंट स्वत: साठी विकत घेतला आहे.  अभिनेत्रीने स्वतः विकत घेतलेले हे पहिले घर आहे आणि ती त्यात ती एकटी राहते. आई-वडिलांच्याजवळ पूजाने हे घरं खरेदी केलं आहे.

 न्यूज 18 टाईम्सच्या , "पूजाने हे घर सजवण्यासाठी बरीच मेहनत घेतेय. घराच्या प्रत्येक बाबीमध्ये ती लक्ष देतेय. घरातल्या प्रत्येक गोष्टीची निवड ती स्वत: करते. पूजाचे शेड्यूल व्यस्त असले तरी ती घरातील कामं पाहण्यासाठी एक दिवसाच्या ब्रेकमध्ये ही ती मुंबईत येईन घराचं काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.'' पूजा या घराचे इंटिरियर स्वत: डिझायन करतेय.


पूजाने तमीळ चित्रपट ‘मुगमूदी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. 2012 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमात पूजाने शक्तीची भूमिका साकारली होती. पूजाला सोशल मीडियावर प्रचंड फॅनफॉलोईंग आहे. पूजाने अक्षय कुमारसोबत ‘हाऊसफुल 4’मध्ये काम केले आहे. लवकरच ती प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार आहे. पूजा आणि प्रभासच्या जोडीचा ‘राधेश्याम’ हा त्रैभाषिक चित्रपट असून गुलशन कुमार आणि टी-सीरिज प्रस्तुत, याचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार करणार आहेत. याशिवाय सर्कस, आचार्य हे चित्रपट तिच्याकडे आहेत.

Web Title: Actress pooja hegde purchased a sea facing apartment in bandra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.