आंतरधर्मीय लग्न, नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; 'त्या' निर्णयाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 10:47 IST2025-11-26T10:43:38+5:302025-11-26T10:47:13+5:30
नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; पोटगीही नाकारली, कारण...

आंतरधर्मीय लग्न, नवऱ्यासाठी करिअर सोडलं, अन् फसली! लग्नाच्या १० वर्षात भरला संसार मोडला; 'त्या' निर्णयाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच बोलली
Pooja Bedi: बॉलिवूड इंडस्ट्रीत अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांना पहिल्याच चित्रपटातून स्टारडम मिळालं. असं एक ९० च्या दशकात चर्चेत असणार नाव म्हणजे अभिनेत्री पूजा बेदी.'लुटेरे', 'जो जिता वो सिकंदर', 'मिलिटरी राज' यांसारख्या सिनेमांमध्ये तिने काम केलं आहे. मात्र,लग्नानंतर अभिनेत्री इंडस्ट्रीपासून अंतर ठेवलं. १९९४ मध्ये तिने फरहान फर्निटरवाला यांच्यासोबत लग्नगाठ बांधली. त्यानंतर तिने काम करणं बंद गेलं आणि पूजा आपल्या वैवाहिक आयुष्यात रमली. मात्र, तिचं नातं हे फार काळ टिकलं नाही. एका मुलाखतीत तिने घटस्फोटाबद्दल भाष्य केलं आहे.
पूजा बेदीचे पती फराहन एका मुस्लिम कुटुंबातील होते.त्यामुळे लग्नानंतर घरातील प्रथा, परंपरा लक्षात घेऊन तिने काम करण्याचं थांबवलं. शिवाय तिने असंही सांगितलं की तिच्या सासरच्या मंडळींना आपल्या सूनेने चित्रपटात काम करु नये,असं वाटतं. त्यामुळे पूजा या क्षेत्रापासून दूर जाणं पसंत केलं. नुकतीच पूजा बेदीने कॉलमिस्ट डॉ शीन गुरिब यांच्या पॉडकास्टमध्ये हजेरी लावली.या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली, फरहान आणि तिच्या लग्नाची बोलणी सुरु असताना अनेकदा तिच्या करिअरवर प्रश्न उपस्थित केले गेले. दोघांच्याही कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता.यामुळे अभिनेत्री इंडस्ट्रीपासून दुरावली. त्यानंतर तिने पूर्ण वेळ आपलं कुटुंब आणि मुलांच्या संगोपणासाठी दिला.
मात्र,लग्नाच्या १० वर्षानंतर पूजाने पती फरहानपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांची जबाबदारी अभिनेत्रीच्या खांद्यावर आली. त्यावेळी पूजा बेदी केवळ ३२ वर्षांची होती आणि तिने कोणाचीही मदत न घेता आपल्या मुलांचं संगोपन केलं.आईचं निधन झाल्यानंतर पूजा एकटी पडली होती. वडीलांनीही दुसरं लग्न केलं.पण,ती डगमगली नाही, विशेष म्हणजे घटस्फोटानंतर पूजा पतीपासून पोटगीही घेतली नाही.
त्याबद्दल बोलताना पूजा म्हणाली,"मी कोर्टात खटला दाखल केला असता तर कुटुंबात कटुता निर्माण झाली असती आणि त्याचा मुलांवर सुद्धा परिणाम झाला असता, म्हणून मी कोणत्याही आर्थिक मदत न घेता नव्याने सुरुवात करणं योग्य मानलं." असा खुलासा अभिनेत्रीने मुलाखतीत केला.