स्टेज ४ कॅन्सरमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस गळाले; Bald लूक शेअर करत झाली भावुक, म्हणाली-
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2025 12:00 IST2025-10-06T11:59:02+5:302025-10-06T12:00:28+5:30
कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमुळे अभिनेत्रीचे केस गळाले. अभिनेत्री सोशल मीडियावर दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे त्यामुळे सर्वांनी तिचंं कौतुक केलंय

स्टेज ४ कॅन्सरमुळे प्रसिद्ध अभिनेत्रीचे केस गळाले; Bald लूक शेअर करत झाली भावुक, म्हणाली-
करिअरच्या शिखरावर असताना अनेक अभिनेत्रींना गंभीर समस्यांचा सामना करावा लागतो. आरोग्यविषयक समस्यांना सामना करताना अभिनेत्रीच्या शारीरिक अवस्थेवरही परिणाम होतो. असाच मोठा परिणाम एका अभिनेत्रीवर झाला आहे. कॅन्सरमुळे अभिनेत्रीच्या डोक्यावरील संपूर्ण केस गळाले आहेत. या अभिनेत्रीचं नाव आहे नफिसा अली. ज्येष्ठ अभिनेत्री नफीसा अली सोढी (Nafisa Ali Sodhi) या सध्या स्टेज ४ कॅन्सरशी झुंज देत आहेत. यावेळी कॅन्सरवर उपचार घेताना त्यांची काय अवस्था झाली याविषयी त्यांनी खुलासा केला आहे.
स्टेज ४ कॅन्सरमुळे अभिनेत्री भावुक, म्हणाली
नफीसा अली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक खास फोटो पोस्ट केला. या फोटोमध्ये त्या 'बाल्ड लूक'मध्ये दिसत आहेत. तरीही त्यांच्या चेहऱ्यावर हसू आहे. या फोटोसोबत त्यांनी एक प्रेरणादायक संदेशही लिहिला. शारीरिक दुखण्याचा सामना करत असूनही आनंदी राहण्याचे महत्त्व त्यांनी सांगितले. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये स्पष्ट केले की, केमोथेरपी उपचारांमुळे केस गळाल्यानंतर त्यांनी हा लूक स्वीकारला आहे. तरीही मनातून आनंदी राहण्याचा त्या प्रयत्न करत आहेत. प्रचंड वेदना होत असूनही चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या नफीसा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत.
नफीसा अली यांना नोव्हेंबर २०१८ मध्ये स्टेज ४ चा पेरिटोनियल आणि ओव्हेरियन कॅन्सर (Peritoneal and Ovarian Cancer) असल्याचे निदान झाले होते. त्यानंतर त्या सातत्याने उपचारातून जात आहेत. त्यांच्या या संघर्षाच्या काळातही त्यांनी आपली जिद्द आणि सकारात्मकता सोडलेली नाही. नफीसा अली या एक अभिनेत्री असण्यासोबतच माजी 'मिस इंडिया', उत्तम जलतरणपटू आणि सामाजिक कार्यकर्त्या म्हणूनही ओळखल्या जातात. 'लाईफ इन अ मेट्रो' सिनेमात त्यांनी साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक झालं.