"मी मूर्खपणा केला.."; बिपाशावर बॉडीशेमिंग केल्यानंतर अखेर मृणाल ठाकूरने मागितली माफी, म्हणाली- '१९ वर्षांपूर्वी..'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 10:39 IST2025-08-15T10:38:49+5:302025-08-15T10:39:57+5:30
मृणाल ठाकूरने बिपाशावर केलेली कमेंट चांगलीच व्हायरल झाली. त्यामुळे तिच्यावर टीकाही झाली. अखेर आता मृणालने याप्रकरणी माफी मागितली आहे

"मी मूर्खपणा केला.."; बिपाशावर बॉडीशेमिंग केल्यानंतर अखेर मृणाल ठाकूरने मागितली माफी, म्हणाली- '१९ वर्षांपूर्वी..'
अभिनेत्री मृणाल ठाकूर सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी तिचा एक जुना व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये तिने अभिनेत्री बिपाशा बासूविषयी एक टिप्पणी केली होती. हा व्हिडिओ ती १९ वर्षांची असताना रेकॉर्ड झाल्याचं सांगितलं जातं. त्यात मृणालने बिपाशाच्या शरीरयष्टीवर बोलताना तिच्या मसल्सचा उल्लेख करत बॉडीशेमिंग केली. याशिवाय स्वतःला बिपाशापेक्षा सुंदर असल्याचं म्हटलं. त्यामुळे सोशल मीडियावर मृणालविरोधात नाराजीचे सूर उमटले. अखेर या सर्व प्रकरणानंतर मृणालने जाहीर माफी मागितली आहे.
टीका वाढल्यानंतर मृणालने सोशल मीडियावर माफी मागितली. तिने इंस्टाग्रामवर लिहिलं की, “मी १९ वर्षांची असताना खूप मूर्खपणा केला. माझे शब्द आणि विनोद किती दुखावणारे असू शकतात हे मला त्या वेळी कळलं नाही. माझा हेतू कोणाचाही अपमान करण्याचा नव्हता, पण मी चुकीचे बोलले. आता अनुभवाने मला कळलं आहे की, सौंदर्य आणि आकर्षण अनेक प्रकारे ओळखता असते. प्रत्येकाची स्वतःची वेगळी ओळख असते.” मृणालने जाहीर माफी मागितल्यावर आता बिपाशाचे चाहते आणि नेटकरी तिच्यावर टीका करणं थांबवतील अशी शक्यता आहे.
या व्हिडिओनंतर अनेकांनी मृणालवर गर्विष्ठपणा आणि असंवेदनशील असल्याचा आरोप केला. चाहत्यांपासून ते सामान्य लोकांपर्यंत सर्वांनीच तिच्यावर टीका केली. बिपाशा बासूने थेट काही प्रतिक्रिया दिली नाही, मात्र तिने सोशल मीडियावर “Strong women lift each other up” असं लिहिलेलं एक स्टेटस शेअर केलं होतं.मृणालने ही घटना खूप वर्षांपूर्वीची असून आता ती अशा गोष्टींविषयी अधिक संवेदनशील असल्याचं स्पष्ट केलं. मृणालच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती नुकतीच 'सन ऑफ सरदार २' सिनेमात दिसली. याशिवाय ती 'डकैत' या आगामी सिनेमात दिसणार आहे.