LMOTY 2022: कियारा अडवाणी ठरली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार', मराठीत मानले लोकमतचे आभार, म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 20:51 IST2022-10-11T20:12:11+5:302022-10-11T20:51:46+5:30
Lokmat Maharashtrian of the Year Awards 2022: बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवणीला मिळाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री श्रेणीतील 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार.

LMOTY 2022: कियारा अडवाणी ठरली 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार', मराठीत मानले लोकमतचे आभार, म्हणाली...
लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळा आज मुंबईत रंगला. या सोहळ्यात महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा, आरोग्य, प्रशासन, उद्योग अशा विविध श्रेणीतील मान्यवरांना महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने गौरवण्यात येते. या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री कियारा अडवाणी हिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या श्रेणीतील महाराष्ट्रीयन ऑफ द इअर पुरस्कारार( Lokmat Maharashtrian of the Year).ने गौरवण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना तिनं मराठीत लोकमतचं आभार मानलं. शेरशाह या चित्रपटासाठी कियाराला पुरस्कार मिळाला आहे. लोकमतने मला हा पुरस्कार दिला त्याबद्दल मनापासून खूप खूप आभारी आहे अशी मराठीत प्रतिक्रिया दिली. यावेळी तिनं लोकमचे आणि चाहत्यांचे आभार मानलं.
यावेळी कियारा लोकमत मीडियाचे संपादकीय संचालक आणि सहव्यवस्थापकीय संचालक ऋषी दर्डा यांनी तिच्या आगामी चित्रपटातील मराठी मुलीच्या भूमिकेबाबत प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना कियारा म्हणाली, मुंबईची मुलगी असल्याने मराठी माणसांमध्ये वाढली आहे, माझे मित्र मैत्रिणी मराठी आहेत, माझ्या टीममध्ये ही खूपजण मराठी आहेत. तसेच शाळेतही मला मराठी बंधनकारक होतं त्यामुळे मला मराठी येतं.
आज कियारा बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. कियाराने मुंबईत शिक्षण पूर्ण केलं आणि ती मॉडेलिंगच्या दुनियेत आली. यानंतर बॉलिवूडमध्ये तिची एन्ट्री झाली. सोशल मीडियावर कियारा अडवाणीची फॅन फॉलोविंग खूप मोठी आहे. अभिनेत्रीच्या फॅशन सेन्सनेही लोकांना भुरळ घातली आहे. कियारा तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.