रणबीर कपूरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स! सुपरहिट सिनेमा देऊनही अभिनेत्रीला मिळालं नाही काम, म्हणाली-"लोक मला..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2025 11:52 IST2025-11-24T11:45:11+5:302025-11-24T11:52:57+5:30
सुपरहिट सिनेमा झळकली, काम मिळत नसल्याने अभिनेत्री झाली डिप्रेशनची शिकार; इंडस्ट्री सोडण्याचा घेतलेला निर्णय, म्हणाली...

रणबीर कपूरसोबत ऑनस्क्रिन रोमान्स! सुपरहिट सिनेमा देऊनही अभिनेत्रीला मिळालं नाही काम, म्हणाली-"लोक मला..."
Karishma Tanna: छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची चुणूक दाखवत प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे करिश्मा तन्ना. २००१ मध्ये जेव्हा तिने 'क्योंकी सास भी कभी बहू थी' मध्ये इंदू म्हणून छोट्या पडद्यावर पदार्पण केले तेव्हा ती प्रत्येक घरातील लाडकी बनली. करिश्माने काही हिंदी चित्रपटांमध्येही सहाय्यक अभिनेत्रीची भूमिका वठवली आहे. मात्र,संजू चित्रपटात तिने साकारलेली पिंकी प्रेक्षकांना प्रचंड आवडली. या भूमिकेनंतर करिश्माला अनेक ऑफर्स मिळतील असं वाचलं होतं. पण, प्रत्यक्षात तसं घडलं नाही.
नुकतीच करिश्मा तन्नाने 'बॉलिवूड बबल'ला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने म्हटलं, संजू चित्रपटानंतर तिला डिप्रेशनचा सामना करावा लागला होता. त्या कठीण काळाविषयी बोलताना अभिनेत्री म्हणाली," मी चित्रपट साईन केल्यानंतर मला वाटलं यातून माझं काम लोकांपर्यंत पोहोचेल. भले भूमिका छोटी असली तरीही बोल्ड आहे. शिवाय गाणंही आहेच. जर भूमिका चांगली नसती, तर मी जास्त विचारही केला नसता. यापुढे मी आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करेन."
मग ती म्हणाली, "लोकं मला त्या भूमिकेमुळे ओळखू लागले होते. आजही लोक मला पिंकी म्हणतात. त्यामुळे मला असं वाटलं की यानंतर चांगल्या ऑफर्स माझ्याकडे येतील. पण तसं घडलं नाही. या गोष्टींमुळे मला कळतंच नव्हतं की माझ्यासोबत काय घडतंय." यावेळी करिश्माने असंही सांगितलं की, जवळपास एक वर्ष ती डिप्रेशनमध्ये गेली होती. आपण काहीच करू शकत नाही, असे विचार तिच्या मनात यायचे.लोक आपल्याबद्दल काय विचार करत असतील, असं तिला वाटाचयं. यामुळे अभिनेत्रीने चक्क इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला होता. असं तिने या मुलाखतीमध्ये सांगितलं.