वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2026 13:19 IST2026-04-11T13:18:31+5:302026-04-11T13:19:12+5:30

अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

actress karishma tanna heavy workout in pregnancy netizens trolled her and gave advice | वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला

वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला

टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्नाने काही दिवसांपूर्वीच प्रेग्नंसीचा खुलासा केला. वयाच्या ४२ व्या वर्षी ती बाळाला जन्म देणार आहे. करिश्मावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. सुडौल बांधा, कमालीची उंची आणि सुंदर व्यक्तिमत्वामुळे करिश्मा तन्ना ओळखली जाते. तिच्या अभिनयाचंही खूप कौतुक होतं. करिश्मा फिटनेसबाबत खूप जागरुक आहे. मात्र आता प्रेग्नंसीतही ती हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. यावरुन नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. 

करिश्मा तन्नाने इन्स्टाग्रामवर जिममधला व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती जड डंबेल्स उचलताना दिसत आहे. वेटलिफ्टिंग करत आहे. इंटेन्स वर्कआउट करत आहे."चला वर्कआउट करूया, मी जिममधील व्हिडिओ पोस्ट करणं खूप मिस करत होते," असं कॅप्शन तिने या व्हिडिओला दिलं आहे. या व्हिडिओमध्ये तिचा बेबी बंप स्पष्टपणे दिसून येत असून अभिनेत्रीच्या फिटनेसचं सर्वत्र कौतुक होत आहे. मात्र काहींनी तिला काळजी घेण्याचाही सल्ला दिला आहे.


करिश्माचा हा वर्कआउट व्हिडिओ पाहून अनेक नेटकऱ्यांनी काळजी व्यक्त करत तिला इशाराही दिला आहे. एका युजरने लिहिले की, "कृपया असे करू नका, देवाने तुम्हाला या वयात आई होण्याचं वरदान दिलं आहे, त्यामुळे इतकी जोखीम घेऊ नका." तर दुसऱ्या एकाने "आधी बाळाची काळजी घ्या, ४२ व्या वर्षी इतका धोका पत्करणं योग्य नाही," अशा कमेंट्स करत तिला प्रेग्नेंसीमध्ये जपून राहण्याचा सल्ला दिला आहे. चाहत्यांच्या या संमिश्र प्रतिक्रियांमुळे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

करिश्मा तन्नाने ६ एप्रिल रोजी पती वरुण बंगेरासोबत एक खास पोस्ट शेअर करत ती प्रेग्नेंट असल्याची आनंदाची बातमी चाहत्यांना दिली होती. ऑगस्ट २०२६ मध्ये त्यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन होणार आहे. करिश्मा सध्या आपल्या आयुष्यातील या सर्वात सुंदर टप्प्याचा मनसोक्त आनंद घेत असून, प्रेग्नेंसीमध्येही ती स्वतःला फिट ठेवण्यासाठी मेहनत घेत आहे.

करिश्मा आणि व्यावसायिक वरुण बंगेरा यांचा विवाह ५ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडला होता. या दोघांची पहिली भेट २०१८ मध्ये झाली होती आणि त्यानंतर वरुणने तिला दुबईमध्ये प्रपोज केले होते. आता लग्नाच्या चार वर्षानंतर हे जोडपे आपल्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. करिश्माच्या या जिद्दीचे आणि फिटनेस प्रेमाचे तिचे काही सहकारी कलाकार मात्र कौतुक करत आहेत.

Web Title : 42 की उम्र में गर्भवती करिश्मा तन्ना का हेवी वर्कआउट; नेटिज़न्स ने दी सावधानी की सलाह।

Web Summary : 42 साल की उम्र में गर्भवती अभिनेत्री करिश्मा तन्ना को हेवी वर्कआउट के लिए आलोचना का सामना करना पड़ रहा है। नेटिज़न्स ने गर्भावस्था के दौरान सावधानी बरतने की सलाह दी, जबकि कुछ ने उनकी फिटनेस की सराहना की। उन्होंने पति वरुण के साथ अपनी गर्भावस्था की घोषणा की, अगस्त 2026 में बच्चे की उम्मीद है।

Web Title : Karishma Tanna, 42, pregnant, heavy workout; netizens advise caution.

Web Summary : Actress Karishma Tanna, pregnant at 42, faces criticism for heavy workouts. Netizens advise caution during pregnancy, while some praise her fitness. She announced her pregnancy with husband Varun, expecting in August 2026.