कंगना सुरुवातीपासूनच बंडखोर, म्हणाली - जेव्हा वडिलांनी मला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा... 

By श्रीकृष्ण अंकुश | Published: February 20, 2021 02:47 PM2021-02-20T14:47:18+5:302021-02-20T14:50:14+5:30

Actress Kangana Ranaut claims she was first rebel rajput woman at 15 reveals her response her father tried to slap her

Actress Kangana Ranaut claims she was first rebel rajput woman at 15 reveals her response her father tried to slap her | कंगना सुरुवातीपासूनच बंडखोर, म्हणाली - जेव्हा वडिलांनी मला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा... 

कंगना सुरुवातीपासूनच बंडखोर, म्हणाली - जेव्हा वडिलांनी मला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा... 

googlenewsNext

मुंबई - कंगना रणौत (Kangana Ranaut) आपल्या बिनधास्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते. आता कंगनाने आपल्या आयुष्याची कहाणी सांगितली आहे. यासंदर्भात तिने अनेक ट्विट करून, ती सुरुवातीपासूनच कशी बंडखोर आहे, हे सांगितले आहे. तसेच, प्रसिद्धीनंतर मी आणखी मोकळेपणाने बोलत आहे, असेही ती म्हणाली. एवढेच नाही, तर यावेळी तीने आपल्या वडिलांसोबत झालेल्या एका वादाचाही किस्सा सांगत, जेव्हा त्यांनी तिला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा काय घडले, हेही तिने सांगितले. (Actress Kangana Ranaut claims she was first rebel rajput woman at 15)

पहिली बंडखोर राजपूत महिला - 
कंगनाने आपल्या पहिल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, "माझ्या वडिलांकडे रायफल आणि बंदूक होती, मी लहान असताना  त्यांनी रागावले की, माझे पाय थरथर कापत. त्यांच्या काळात ते महाविद्यालयांत गँगवार करण्यासाठी प्रसिद्ध होते. यामुळे त्यांची ओळख गुंड अशी झाली होती. मी वयाच्या 15 व्या वर्षीच त्यांच्यासोबत भांडून घर सोडले होते. अशा पद्धतीने मी 15 वर्षांच्या वयातच पहिली बंडखोर राजपूत महिला ठरले होते."

"मी दीपिका किंवा आलिया नाही, कंबर हालवत नसून थेट हाडं तोडते"; कंगनाचा सणसणीत टोला

पुढच्या ट्विट मध्ये ती म्हणते, या चिल्लर इंडस्ट्रीला वाटते, की, मला मिळालेले यश माझ्या डोक्यात घुसले आहे आणि ते मला नीट करू शकतात. मी नेहमीच बंडखोर होते. यशामुळे फक्त माझा आवाज वाढला आहे आणि आज मी देशातील सर्वात महत्वाच्या आवाजांपैकी एक आहे. इतिहास साक्षी आहे, की ज्यांनी-ज्यांनी मला नीट करण्याचा प्रयत्न केला, त्यांना मीच नीट केले आहे.''

राम गोपाल वर्मांचं डिलीट ट्विट झाले व्हायरल, कंगना राणौतला म्हटले होते न्यूक्लियर बॉम्ब

जेव्हा वडिलांनी थापड मारण्याचा प्रयत्न केला - 
आपल्या वडिलांसंदर्भात बोलताना कंगनाने त्यांचा फोटो शेअर करत म्हटले आहे, की "मी जगातील सर्वोत्कृष्ट डॉक्टर व्हावे, अशी माझ्या वडिलांची इच्छा होती. त्यांना वाटत होते, की मला चांगल्या इंस्टिट्यूटमध्ये शिकवून ते क्रांतीकारी वडिल होत आहेत. मात्र, जेव्हा मी शाळेत जाण्यास नकार दिला, तेव्हा त्यांनी मला थापड मारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा मी त्यांचा हात पकडला आणि म्हणाले, तुम्ही मला थापड माराल, तर मीही तुम्हाला थापड मारीन."

पुढे कंगना म्हणाली, तो आमच्यातील नात्याचा शेवट होता. त्यावेळी माझ्या वडिलांनी केवळ माझ्याकडे आणि माझ्या आईकडे बघितले आणि आपल्या रूममध्ये निघून गेले. मला माहित होते, की मी सीमा ओलांडली आहे, त्यानंतर मी त्यांना कधीच मिळवू शकले नाही. मी कायमची त्यांच्यापासून दूर गेले. मात्र, मी पिंजऱ्यात राहू शकत नाही आणि स्वातंत्र्य मिळविण्यासाठी मी काहीही करू शकत होते.''
 

Web Title: Actress Kangana Ranaut claims she was first rebel rajput woman at 15 reveals her response her father tried to slap her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.