'जीवनातील कठीण काळात आहे...' म्हणत अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 14:14 IST2023-06-09T14:14:05+5:302023-06-09T14:14:33+5:30

Kajol : अभिनेत्री काजोलचे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. मात्र तिच्या एका निर्णयामुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियापासून दूर राहण्याची घोषणा केली.

Actress Kajol takes break from social media saying 'It's a difficult time in life...' | 'जीवनातील कठीण काळात आहे...' म्हणत अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

'जीवनातील कठीण काळात आहे...' म्हणत अभिनेत्री काजोलनं सोशल मीडियाला ठोकला रामराम

अभिनेता शाहरुख खानसोबत DDLJ, कुछ कुछ होता है आणि दिलवाले यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री काजोल(Kajol)चे सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोव्हिंग आहे. मात्र तिच्या एका निर्णयामुळे तिचे चाहते हैराण झाले आहेत. नुकतेच तिने सोशल मीडियापासून दूर राहण्याची घोषणा केली. एवढेच नाही तर त्याने इन्स्टाग्रामवरून तिचे सर्व फोटो काढून टाकले आहेत. 

अभिनेत्री काजोल देवगनचे इन्स्टाग्रामवर १४.४ दशलक्ष फॉलोअर्स आहेत, जे तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्स पाहण्यासाठी उत्सुक आहेत. दरम्यान, आज अचानक तिने केलेल्या एका पोस्टने सर्वांनाच धक्का दिला आहे. खरेतर काजोलने थोड्या वेळापूर्वी एक पोस्ट शेअर केली होती, ज्यामध्ये तिने सोशल मीडियापासून ब्रेक घेण्याची घोषणा केली आहे. इतकेच नाही तर त्याने इंस्टाग्राम अकाउंटवरून अपलोड केलेले सर्व फोटो डिलीटही केले आहेत. त्यानंतर चाहत्यांनी तिला प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे.

सोशल मीडियावरील पोस्टही केल्या डिलिट

काजोलने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आणि कॅप्शनमध्ये लिहिले की, मी सोशल मीडियातून ब्रेक घेत आहे. तिने शेअर केलेल्या फोटोत लिहिले की, 'मी माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण परीक्षेला सामोरे जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टशिवाय अभिनेत्रीने इतर सर्व इंस्टाग्राम पोस्ट डिलीट केल्या आहेत.ही पोस्ट आल्यानंतर आता त्याच्या अकाऊंटवर चाहत्यांकडून खूप प्रतिक्रिया येत आहेत. 

काजोल शेवटची सलाम वेंकी या चित्रपटात दिसली होती, ज्याची जोरदार चर्चा झाली होती. लवकरच ती लस्ट स्टोरीज २मध्ये दिसणार आहे.

Web Title: Actress Kajol takes break from social media saying 'It's a difficult time in life...'