अभिनेत्री इलियाना डिक्रुझने एक न्युड फोटो शेअर केला,मात्र कमेंटचा ऑप्शन ब्लॉक केला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2017 12:08 IST2017-01-24T06:31:43+5:302017-01-24T12:08:03+5:30
आपलं खासगी जीवन आणि बोल्ड अंदाज यामुळे बॉलीवुड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा इलियानाच्या नावाच्या ...

अभिनेत्री इलियाना डिक्रुझने एक न्युड फोटो शेअर केला,मात्र कमेंटचा ऑप्शन ब्लॉक केला?
आ लं खासगी जीवन आणि बोल्ड अंदाज यामुळे बॉलीवुड अभिनेत्री इलियाना डिक्रुझ कायमच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा इलियानाच्या नावाच्या चर्चा सुरु झाल्यात. कारण सध्या सोशल नेटवर्किंग साईटवर इलियानाचा न्यूड फोटो धुमाकूळ घालतोय. खुद्द इलियानाने हा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये इलियाना न्यूड होऊन बाथटबमध्ये शांतपणे झोपल्याचे पाहायला मिळतंय. इलियानाचा ब्वॉयफ्रेंड एंड्र्यू निबोन याने तिची ही न्यूड छबी कॅमे-यात कैद केली आहे. मात्र इलियानाच्या या फोटोवर तुम्हाला कमेंट करायची असेल तर तुमची निराशा होऊ शकते. कारण इलियानाने कमेंटचे ऑप्शन ब्लॉक केला आहे. या फोटोमुळे सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया येतील आणि कुणीही काहीही पोस्ट करेल याचा इलियानाला अंदाज आहे. त्यामुळेच की या कमेंटपासून वाचवण्यासाठी तिने ते ऑप्शन ब्लॉक करणे शहाणपणाचे समजलं असावं. इलियानाने याआधी असे बोल्ड फोटो सोशल मीडियावर कधीही शेअर केलेले नाहीत. पहिल्यांदाच तिने अशाप्रकारे न्यूड फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. याआधी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी इलियानाने शेअर केलेल्या व्हिडीओची चर्चा झाली होती. इलियाना बिकीनी परिधान करुन पाण्यात डान्स करत असल्याचे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळालं होते. विशेष म्हणजे हा व्हिडीओसुद्धा इलियानाच्या ब्वॉयफ्रेंडनेच बनवला होता. सध्या इलियाना अभिनेता अर्जुन कपूरसह 'मुबारका'U या सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी आहे. मात्र सध्या तरी या आगामी सिनेमापेक्षा इलियानाच्या हॉट न्यूड फोटोचीच सोशल साइटवर जोरदार आणि तितकीच खुमासदार चर्चा सुरु आहे.
![]()