'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2023 16:31 IST2023-05-03T16:29:21+5:302023-05-03T16:31:23+5:30

Himani shivpuri : अनुभवी कलाकार अन् प्रसिद्ध कलाकार समोरासमोर येतात तेव्हा..; हिमानी शिवपुरींनी सांगितला माधुरीसोबतच्या पहिली भेटीचा किस्सा

actress himani shivpuri share experiance of meet first time to madhuri dixit in hum apke hai kaun set | 'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा

'ती खुर्चीवर बसली होती अन्...'; हिमानी शिवपुरी यांनी सांगितला धकधक गर्लच्या पहिल्या भेटीचा किस्सा

बॉलिवूडच्या इतिहासाता विशेष गाजलेला सिनेमा म्हणजे 'हम आपके हैं कौन' हा सिनेमा त्याकाळी बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमामध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मांदियाळी असल्याचं पाहायला मिळालं. यात काही कलाकारांकडे दांडगा अनुभव होता. तर, काही कलाकारांकडे प्रसिद्ध त्यामुळे हा चित्रपट सगळ्याच बाजूने जमून आला होता. मात्र, एक अनुभवी कलाकार आणि एक नवा पण प्रसिद्ध कलाकार जेव्हा समोरासमोर येतो त्यावेळी काय होतं. हे अभिनेत्री हिमानी शिवपुरी (himani shivpuri) यांनी एका मुलाखतीत सांगितलं. माधुरी दिक्षित (madhuri dixit) आणि त्यांची पहिली भेट कशी होती यावर त्यांनी भाष्य केलं.

'हम आपके हैं कौन'च्या सेटवर प्रत्येक कलाकार स्पॉट बॉयपासून ते को स्टारपर्यंत प्रत्येकाशी मिळून मिसळून वागत होते. त्यामुळे या सेटवर कायम आनंदाचं वातावरण असायचं. मात्र, ज्यावेळी हिमानी शिवपुरी यांची या सिनेमात एन्ट्री झाली त्यावेळी सेटवरंच वातावरण पूर्ण बदलून गेलं. याविषयी बोलताना त्यांनी माधुरीच्या भेटीचा किस्सा सांगितला.

हम आपके हैं कौन: सेटवर घडला होता मोठा अपघात; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या केसांना लागली होती आग

"सिनेमाचे दिग्दर्शक सूरज बडजात्या मला सिनेमाच्या सेटवर घेऊन गेले. त्यावेळी सिनेमातील कलाकार माधुरीसोबत गप्पा मारत होते. मी तेथे पोहोचल्यावर सूरज बडजात्या यांनी माझी ओळख सगळ्यांशी करुन दिली. या आहेत हिमानी शिवपुरी. या खूप अनुभवी अभिनेत्री आहेत, असं त्यांनी सांगितलं. त्यावेळी माधुरी खुर्चीवर बसली होती", असं हिमानी यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणतात, "सूरज यांचे हे शब्द ऐकल्यावर खुर्चीवर बसलेली माधुरी पटकन उठून उभी राहिली. मी येताच माधुरी दीक्षित उठून उभी राहणं हा माझ्यासाठी फार प्रेरणादायी क्षण होता. तेव्हा ती फार मोठी अभिनेत्री होती. परंतु, मनात कोणताही मोठेपणा न ठेवता ती चटकन उठली आणि तिने मोठ्यांचा मान ठेवला. त्यानंतर आमची खूप छान गट्टी जमली आणि आम्ही दोघी मिळून सेटवरील प्रत्येकाला त्रास द्यायला लागलो. ज्यामुळे सेटवरचं वातावरण अजूनच बदललं. हम आपके हैं कौन सिनेमानंतरही मी माधुरी बरोबर अनेक सिनेमात काम केलं. तेव्हा मला कळलं की माधुरी उत्तम अभिनेत्री आहेच पण खूप चांगली माणूसही आहे".

दरम्यान, 'हम आपके हैं कौन'मध्ये हिमानी यांनी डॉक्टर काकांच्या पत्नीची भूमिका साकारली होती. त्यांची भूमिका छोटेखानी असली तरीदेखील ती चांगली लोकप्रिय झाली होती.
 

Web Title: actress himani shivpuri share experiance of meet first time to madhuri dixit in hum apke hai kaun set