​या अभिनेत्रीने आपल्या अभिनेता पतीच्या चित्रपटाच्या यशासाठी केले होते टक्कल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 14:07 IST2017-11-08T08:37:36+5:302017-11-08T14:07:36+5:30

अभिनेता कमल हसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तर त्यांना सुपरस्टार मानले जाते. कमल ...

This actress had done bald balm for the success of her actor husband's film | ​या अभिनेत्रीने आपल्या अभिनेता पतीच्या चित्रपटाच्या यशासाठी केले होते टक्कल

​या अभिनेत्रीने आपल्या अभिनेता पतीच्या चित्रपटाच्या यशासाठी केले होते टक्कल

िनेता कमल हसन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. दाक्षिणात्य इंडस्ट्रीत तर त्यांना सुपरस्टार मानले जाते. कमल हासन यांनी केवळ दाक्षिणात्य इंडस्ट्रीतच नव्हे तर हिंदी इंडस्ट्रीत देखील आपला एक वेगळा दबदबा निर्माण केला आहे. सागर, सदमा यांसारख्या त्यांच्या चित्रपटातील भूमिकांचे तर प्रचंड कौतुक केले जाते. ते एक चांगले अभिनेते असण्यासोबतच खूपच चांगले दिग्दर्शक, निर्माते, लेखक आणि गायक आहेत. त्यांना आजवरच्या त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.  
कमल हासन यांचा एक चित्रपट हिट व्हावा यासाठी त्यांची पत्नी सारिकाने नवस केला होता आणि तिने या नवसापोटी टक्कल देखील केले होते. ११९६ ला कमल हासन यांचा इंडियन म्हणजेच हिंदुस्तानी हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कमल हासन यांची मुख्य भूमिका होती. या चित्रपटाची कथा कमल हासन यांना प्रचंड भावली होती. त्यामुळे हा चित्रपट त्यांच्या हृदयाच्या खूपच जवळ होता. त्यामुळे या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगला व्यवसाय करावा अशी कमल हासन यांची इच्छा होती आणि त्यामुळेच सारिकाने तिरूपती बालाजी देवस्थानाला जाऊन नवस मागितला होता आणि चक्क टक्कल केले होते. एका अभिनेत्रीने अशाप्रकारे टक्कल केल्याने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता.

kamal haasan sarika

इंडियन म्हणजेच हिंदुस्तानी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच गाजला होता. एवढेच नव्हे तर या चित्रपटासाठी कमल हासन यांना उत्कृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. तसेच त्यांना फिल्मफेअरचे अॅवॉर्ड देखील मिळाले होते. तामिळनाडू राज्याने देखील कमल हासन यांना उत्कृष्ट अभिनेत्याच्या पुरस्काराने गौरवले होते. 
कमल हासन यांच्या इंडियन म्हणजेच हिंदुस्तानी या चित्रपटाच्या प्रीमियरच्या वेळी लोकांना सारिकाचा हा नवा लूक पाहायला मिळाला होता. सारिका या चित्रपटाच्या प्रीमियरला टक्कल करून आली होती. सारिकाने टक्कल का केले याबाबत चांगलीच चर्चा रंगली होती. काही दिवसांनी मीडियाला सारिकाच्या टक्कल करण्यामागचे खरे कारण कळले होते. 

Also Read : वादांचे दुसरे नाव म्हणजे कमल हासन; यामुळे सापडलायं वादात!

 

Web Title: This actress had done bald balm for the success of her actor husband's film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.